CWG 2018 : २५ मीटर पिस्टल शूटिंगमध्ये हीना सिद्धूची 'सोनेरी' कामगिरी, भारताला 11वं सुवर्ण

CWG 2018 : २५ मीटर पिस्टल शूटिंगमध्ये हीना सिद्धूची 'सोनेरी' कामगिरी, भारताला 11वं सुवर्ण

हीनाचं स्पर्धेतील हे दुसरं पदक आहे. या पदकामुळे भारताला एकूण 11 सुवर्ण, 5 रजत आणि 5 कांस्य अशी एकूण 20 पदकं मिळालीयत.

  • Share this:

10 एप्रिल : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर पडलीय. 25 मिटर्स पिस्टल शूटिंगमध्ये भारताच्या हीना सिद्धूला सुवर्णपदक मिळालंय.हीनाचं स्पर्धेतील हे दुसरं पदक आहे. या पदकामुळे  भारताला एकूण 11 सुवर्ण, 5 रजत आणि 5 कांस्य अशी एकूण 20 पदकं मिळालीयत.

आज झालेल्या नेमबाजीतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात हीना सिद्ध आणि अन्नू सिंह भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. मात्र अन्नू सिंहचे आव्हान फार काळ टिकले नाही. हीना सिद्धू सुद्धा सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. पण शेवटच्या फेऱ्यांमध्ये हीनाने आपली कामगिरी उंचावली.महत्त्वाचं म्हणजे तिनं पहिल्यांदाच 25 मिटर्स शूटिंग केलं आणि सुवर्णपदक पटकावलं.

आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि मलेशियाच्या नेमबाजांना मागे टाकत सुवर्णपदकावर कब्जा केला. या प्रकारात ऑस्ट्रेलियाला रौप्य तर मलेशियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 12:28 PM IST

ताज्या बातम्या