Home /News /sport /

Commonwealth मध्ये सुशिला-विजयची ऐतिहासिक कामगिरी, भारताला 8 वे मेडल!

Commonwealth मध्ये सुशिला-विजयची ऐतिहासिक कामगिरी, भारताला 8 वे मेडल!

भारतीय ज्युडो खेळाडू एल सुशिला देवीने (Sushila Devi) कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) पुरुषांच्या 48 किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल जिंकलं आहे.

    बर्मिंघम, 1 ऑगस्ट : भारतीय ज्युडो खेळाडू एल सुशिला देवीने (Sushila Devi) कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) 48 किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. सुशीलाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मिशेल वाइटबुटचा 4.25 मिनिटांमध्ये पराभव केला. चार मिनिटांच्या नियमित वेळेत दोन्ही ज्युडो खेळाडूंनी एकही पॉइंट घेतला नव्हता. वाइटबुटने यानंतर गोल्डन पॉइंट घेऊन मॅच जिंकी. सुशिलाने ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्येही 2014 साली सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. सुशिलाने याआधी सेमी फायनलमध्ये मॉरिशियसच्या प्रिसिला मोरांडचा पराभव करत पदक निश्चित केलं होतं. क्वार्टर फायनलमध्ये सुशिलाने मालावीच्या हॅरियट बोनफेसला धूळ चारली होती. विजय कुमार यादवला ब्रॉन्झ मेडल पुरुषांच्या 60 किलो रेपेशाजमध्ये विजय कुमारने (Vijay Kumar Yadav) स्कॉटलंडच्या डिनलान मुनरोला हरवून ब्रॉन्झ मेडलच्या सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात विजय कुमार यादवने सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडुलाईड्सचा पराभव करत ब्रॉन्झ मेडल जिंकलं. सुशिला आणि विजय यांना मिळालेल्या पदकांसह भारताची बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधल्या पदकांची संख्या 8 एवढी झाली आहे. आतापर्यंत भारताला 3 गोल्ड, 3 सिल्व्हर आणि 2 ब्रॉन्झ मेडल मिळाली आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या