Home /News /sport /

Commonwealth : बजरंग पाठोपाठ साक्षीचाही गोल्डन पंच, भारताची सुवर्ण कामगिरी सुरूच

Commonwealth : बजरंग पाठोपाठ साक्षीचाही गोल्डन पंच, भारताची सुवर्ण कामगिरी सुरूच

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) भारताची स्टार रेसलर साक्षी मलिकने (Sakshi Malik) गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकलं आहे.

    बर्मिंघम, 5 ऑगस्ट : कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) भारताची स्टार रेसलर साक्षी मलिकने (Sakshi Malik) गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकलं आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधलं भारताचं हे 8 वे गोल्ड मेडल आहे. महिलांच्या 62 किलो वजनी गटात साक्षी मलिकने फायनलमध्ये कॅनडाच्या एना गोडिनेज गोंजालेजचा पराभव केला. रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या साक्षीचं मागच्या 6 वर्षांमधल्या मोठ्या स्पर्धांमधलं हे पहिलंच मेडल आहे. साक्षीच्या या कामगिरीमुळे कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधली भारताची पदकांची संख्या 23 झाली आहे. रेसलिंगमध्ये भारताला आता दोन गोल्ड आणि एक सिल्व्हर मेडल मिळालं आहे. काहीच वेळापूर्वी बजरंग पुनियानेही (Bajarang Punia) रेसलिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. बजरंग पुनियाने फायनलमध्ये कॅनडाच्या लछलन मॅकनीलचा 9-2 ने पराभव केला. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या बजरंगने सेमी फायनलमध्ये इंग्लंडच्या जॉर्ज रॅमवर विजय मिळवत फायनल गाठली होती. बजरंग पुनिया पुरुषांच्या फ्री स्टाईल 65 किलो इव्हेंटमध्ये मॉरिशियसचा जीन गुलियाने जोरिस बांडोऊला एका मिनिटात 6-0 ने हरवून सेमी फायनलमध्ये पोहोचला होता. क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बजरंगला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला. सुरूवातीलाच त्याने नौरूच्या लोवे बिंघमला पाडून 4-0 ने विजय मिळवला. बजरंगने आपल्या प्रतिस्पर्ध्याला जाणून घ्यायला एक मिनिटाचा वेळ घेतला, यानंतर त्याने बिघंमला लोळवून मॅचच संपवली. अंशु मलिकलाही सिल्व्हर भारताची 21 वर्षांची रेसलर अंशु मलिकचं (Anshu Malik) गोल्ड मेडल मात्र थोडक्यात हुकलं. महिलांच्या 57 किलो वजनी गटात अंशुने सिल्व्हर मेडल जिंकलं. अंशुला फायनलमध्ये नायजेरियाच्या ओडुनायो अदेकुओरोयेने 6-4 ने पराभूत केलं. अंशुने फायनलआधी प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. क्वार्टर फायनलमध्ये तिने ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिमियोनिडिस आणि सेमी फायनलमध्ये श्रीलंकेच्या नेथमी पोरूथोटागेवर तांत्रिक श्रेष्ठता (10-0) च्या आधारवर विजय मिळवला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या