Home /News /sport /

Commonwealth मध्ये भारताची गोल्डन कामगिरी सुरूच, टेबल टेनिसमध्येही सुवर्ण पदक!

Commonwealth मध्ये भारताची गोल्डन कामगिरी सुरूच, टेबल टेनिसमध्येही सुवर्ण पदक!

टेबल टेनिसच्या टीमने भारताला (India) कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) 11 वे पदक मिळवून दिलं आहे. पुरुष टीमने (Table Tennis) फायनलमध्ये सिंगापूरचा 3-1 ने पराभव करत गोल्ड मेडल पटकावलं.

    बर्मिंघम, 2 ऑगस्ट : टेबल टेनिसच्या टीमने भारताला (India) कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) 11 वे पदक मिळवून दिलं आहे. पुरुष टीमने (Table Tennis) फायनलमध्ये सिंगापूरचा 3-1 ने पराभव करत गोल्ड मेडल पटकावलं. जी साथीयानच्या (G Sathiyan) शानदार कामगिरीमुळे भारताला ही ऐतिहासिक कामगिरी करता आली आहे. त्याने डबल्समध्ये हरमीत देसाईसोबत (Harmeet Desai) डबल्सचा हा सामना जिंकला. यानंतर आपल्या सिंगल्सच्या सामन्यातही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत विरोधी खेळाडूला धूळ चारली. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला आतापर्यंत 5 गोल्ड, 3 सिल्व्हर आणि 3 ब्रॉन्झ मेडल मिळाली आहेत. टेबलमध्ये भारतीय टीम सहाव्या क्रमांकावर कायम आहे. त्याआधी आजच महिला लॉन बॉल्स टीमनेही गोल्ड मेडल जिंकत इतिहास घडवला. टेबल टेनिसच्या टीम इव्हेंटमध्ये पहिले डबल्सचा मुकाबला झाला. जी साथीयान आणि हरमीत देसाईच्या जोडीने 3-0 ने दिमाखदार विजय मिळवला. त्यांनी सिंगापूरच्या यांग येक आणि यू पेंग या जोडीचा 13-11, 11-7 आणि 11-5 असा पराभव केला. यानंतर सिंगल्सच्या मुकाबल्यात जी साथीयानने 3-1 ने विजय मिळवून टीमला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. त्याने यू पेंगचा 12-10, 7-11, 11-7 आणि 11-4 असा पराभव केला. यानंतर हरमीत देसाईने आपली सिंगल्स मॅच जिंकून गोल्ड मेडल निश्चित केलं. हरमीतचे उत्कृष्ट खेळ तिसऱ्या सिंगल्स मुकाबल्यात हरमीत देसाईने विरोधी खेळाडूंना संधी दिली नाही. त्याने जी चियूला 3-0 ने मात दिली. हरमीतने हा सामना 11-8, 11-5 आणि 11-6 अशी जिंकली. भारताला आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्समध्ये 11 मेडल मिळाली आहेत, यापैकी 7 वेटलिफ्टिंगमध्ये तर 2 मेडल ज्युडो खेळाडूंनी जिंकली आहेत. आज लॉन बॉल्स आणि टेबल टेनिसच्या फायनलमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळालं. आजच महिला बॅडमिंटन टीमची फायनल होणार आहे, यातही भारताला गोल्ड मेडल मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या