CWG 2018 : राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताला आठवं सुवर्णपदक, जीतू रायला 10 एमएम एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक

CWG 2018 : राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताला आठवं सुवर्णपदक, जीतू रायला 10 एमएम एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक

भारतीय नेमबाजांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अचूक निशाणा साधलाय. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जितू रायने सुवर्णपदक पटकावलं आहे, तर ओम मिथरवाल याला कांस्यपदक मिळालं.

  • Share this:

09 एप्रिल : भारतीय नेमबाजांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अचूक निशाणा साधलाय. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जितू रायने सुवर्णपदक पटकावलं आहे, तर ओम मिथरवाल याला कांस्यपदक मिळालं. जितूने 235.1 गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 214.3 गुण मिळवणाऱ्या ओम मिथरवालने कांस्य पटकावलं. तर भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंग याने 105 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं.

तर बँडमिटनच्या मिश्र सांघिक गटात भारताची आज अंतिम फेरीत मलेशियाशी गाठ असणार आहे. त्यामुळे सायना नेहवालच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताला सुर्वणपदकांची अपेक्षा आहे. तसंच पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या मेरी कोमने पदार्पणात 48 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2018 09:28 AM IST

ताज्या बातम्या