न्यूझीलंडसाठी 'हाय अलर्ट', भारताचा हुकुमी एक्का करणार कमबॅक

बांगलादेश दौऱ्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारताचा स्टार प्लेयर कमबॅक करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 12:03 PM IST

न्यूझीलंडसाठी 'हाय अलर्ट', भारताचा हुकुमी एक्का करणार कमबॅक

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ शानदार कामगिरी करत आहे. आधी वेस्ट इंडिजला क्लिन स्विप दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला भारतीय संघानं व्हाईटवॉश दिला. आता भारताचे पुढचे लक्ष्य हे बांगलादेशचा संघ असणार आहे. भारत-बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरपासून टी-20 आणि कसोटी मालिका होणार आहे.

दरम्यान, वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत आहे. याचा परिणाम खेळाडूंच्या आरोग्यावर आणि फिटनेसवर होत आहे. परिणामी भारताचे आघाडीचे दोन खेळाडू जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या दुखापतीमुळं संघाबाहेर आहेत. बुमराह वेस्ट इंडिज विरोधात कसोटी सामन्यात मैदानात उतरला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून दुखापतींमुळे त्याने माघार घेतली. मात्र आता लवकरच बुमराह टीम इंडियामध्ये कमबॅक करू शकतो.

बुमराहच्या फोटोमुळं चाहते सुखावले

वेस्ट इंडिज विरोधात शेवटचा कसोटी सामना खेळलेला, त्यानंतर त्याच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यामुळं तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सामिल होऊ शकला नाही. एवढेच नाही तर, बांगलादेश दौऱ्यातही बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र बुमराहनं सोशल मीडियावर टाकलेल्या एका फोटोमुळं त्याचे चाहते प्रचंड सुखावले आहेत. बुमराहनं फोटो शेअर करत लवकरच येतोय...असे कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

Coming soon! 💪🏼

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1) on

Loading...

लवकरच होणार बुमराहचा कमबॅक

बुमराह सध्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. त्यामुळं तो लवकरच संघात दाखल होऊ शकतो. दरम्यान बांगलादेश विरोधात टी-20 आणि कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांत देण्यात आली आहे. दरम्यान यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत बुमराह कमबॅक करू शकतो. न्यूझीलंड विरोधात पाच टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने होणार आहेत.

बुमराहची सर्जरी होणार नाही

बुमराहच्या मेडिकल रिपोर्टवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा नितीन पटेल देखरेख करणार आहे. बुमराह उपचारासाठी लंडनला जाऊन आला होता. बुमराहची जखम सध्या ऑटो हील मोडवर आहे त्यामुळं त्याला सर्जरीची विशेष गरज नाही आहे. त्यामुळं आता बुमराह लवकरच कमबॅक करणार असे चित्र दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 12:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...