मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोचचे अश्लील कृत्य, महिला बॉक्सिंग खेळाडूवर स्पर्धेला जात असताना ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार

कोचचे अश्लील कृत्य, महिला बॉक्सिंग खेळाडूवर स्पर्धेला जात असताना ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार

कलकत्ता येथे स्पर्धेला जात असताना माजी भारतीय बॉक्सिंग खेळाडूने हे घृणास्पद कृत्य केले आहे

कलकत्ता येथे स्पर्धेला जात असताना माजी भारतीय बॉक्सिंग खेळाडूने हे घृणास्पद कृत्य केले आहे

कलकत्ता येथे स्पर्धेला जात असताना माजी भारतीय बॉक्सिंग खेळाडूने हे घृणास्पद कृत्य केले आहे

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 17 मार्च : 19 वर्षीय महिला बॉक्सिंग खेळाडूच्या (Boxing Player) लैंगिक शोषणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात माजी भारतीय बॉक्सिंग खेळाडूला अटक करण्यात आली आहे. संदीप मलिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते बॉक्सिंग कोच आहे आहेत आणि बॉक्सिंग अकॅडमीही चालवतात. 28 वर्षीय संदिप मलिक यांना पोलिसांनी मंगळवारी (17 मार्च) ताब्यात घेतले. 19 वर्षीय महिला खेळाडू ट्रेनमधून प्रवास करीत असताना संदिप यांनी तिच्या लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे वाचा - 6 दिवसांच्या लेकीला 10 रुपयांत विकलं, वाचा आईवर अशी कोणती परिस्थिती ओढवली? 19 वर्षीय तरुणी बॉक्सिंग टीमसह कलकत्ता येथे गेली होती. येथे टीमला Classic Boxing Championship 2020 मध्ये सहभागी व्हायचे होते. यादरम्यान संदिप मलिक यांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. स्पर्धेवरुन परतल्यानंतर तरुणीने ठाण्यात कोचविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत तरुणीने सांगितले आहे की, 27 फेब्रुवारी रोजी ती कलकत्ता येथे जाण्यासाठी दिल्लीहून दुरांतो एक्सप्रेसमध्ये चढली होती. ट्रेनमध्ये संदिप यांनी तिच्यासोबत वाईट वागले. ही स्पर्धा संपेपर्यंत ते तिच्यासोबत असंच वागत असल्याचं तिने सांगितले. ती एकटी असल्याने विरोध करू शकली नाही आणि अत्याचार सहन केला. 13 मार्च रोजी दिल्लीत परतल्यानंतर तरुणीने कोचविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी मलिक विरोधात भारतीय दंड विधानअंतर्गत कलम 354 – अ आणि कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे वाचा - रत्नागिरीत आलेल्या एका व्यक्तीमध्ये आढळली कोरोना संबंधित लक्षणे, रुग्णालयात दाखल
First published:

Tags: Sexual harassment

पुढील बातम्या