News18 Lokmat

प्रशिक्षकपदाची चुरस अंतिम टप्प्यात, रवी शास्त्रीसह 'हे' पाच जण आहेत स्पर्धेत!

कपिल देव यांच्या समितीच्या वतीनं शुक्रवार प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 08:55 PM IST

प्रशिक्षकपदाची चुरस अंतिम टप्प्यात, रवी शास्त्रीसह 'हे' पाच जण आहेत स्पर्धेत!

ICC Cricket World Cup नंतर बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. दरम्यान कपिल देव यांच्या समितीनं या सहा नावांची निवड केली आहे.

कपिल देव यांच्या समितीच्या वतीनं शुक्रवार (16 ऑगस्ट) रोजी प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या जातील त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारताला नवा प्रशिक्षक मिळू शकतो.

दरम्यान रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकासाठी कमाल वयाची मर्यादा 60 वर्ष ठेवली आहे. त्यामुळं त्यांना संधी मिळू शकते.

रवी शास्त्री यांच्याशिवाय भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी हे आहेत. त्यांनी 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये लंकेला अंतिम फेरीत पोहचवलं होतं. त्यानंतर 2012 पासून टॉम मूडी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हैदराबादनं 2016 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. 53 वर्षांच्या मूडी यांचं वय 53 असून 8 कसोटी आणि 76 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे.

लालचंद राजपूत यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम केलं आहे. ज्यावेळी भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी ते व्यवस्थापक होते. राजपूत गेल्या चार वर्षांपासून झिम्बॉम्बे क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. झिम्बॉम्बे क्रिकेटला आयसीसीने निलंबित केलं आहे. सध्या ते कॅनडातील ग्लोबल टी20 लीगमध्ये विनिपेग हॉक्सच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत आहेत.

Loading...

न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसनही या शर्यतीत सामिल झाला आहे. 44 वर्षीय हेसन यांनी भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरण्यात तयार आहे. 2015च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पोहचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी प्रशिक्षक म्हणून हेसन काम पाहतात.

भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि फिल्डिंग कोच रॉबिन सिंग यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. 136 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेल्या रॉबिन सिंग यांनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जस या संघांचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते.

याशिवाय वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि अफगाणिस्तानचा कोच फिल सिमन्स यानंही प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. 2004मध्ये सर्वात आधी त्यांची निवड झिम्बॉम्बे संघाच्या प्रशिक्षकपदी झाली होती. त्यानंतर आर्यलॅंड आणि वेस्ट इंडिज संघाचेही त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 08:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...