बीसीसायच्या पदाधिकाऱ्यांना हटवा-प्रशासकीय समिती

संबंधित पदाधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन न केल्यानं ही शिफारस करण्यात आली आहे.

संबंधित पदाधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन न केल्यानं ही शिफारस करण्यात आली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली,17 ऑगस्ट: सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची शिफारस बुधवारी सुप्रीम कोर्टात केली आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन न केल्यानं ही शिफारस करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या या समितीचे अध्यक्ष विनोद राय आहेत. या समितीने आपला 26 पानी रिपोर्ट सुप्रीम कोर्टात बुधवारी सादर केला. त्यानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष सी.के.खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचीही हकालपट्टी करण्याची शिफारस प्रशासकीय समितीनं केली आहे. सुप्रीम कोर्टाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा आदेश बीसीसायच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यासाठी 6 महिन्यांचा अवधीही देण्यात आला होता. पण या पदाधिकाऱ्यांनी लोढा समितीच्या शिफारसी 6 महिने संपले तरी अजूनही लागू केलेल्या नाहीत असं अहवालात म्हटलंय. त्यामुळे या आधीच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणेच याही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी असं प्रशासकीय समितीचं म्हणणं आहे. यावर सी.के.खन्ना, अमिताभ चौधरी आणि अनिरुद्ध चौधरी या पदाधिकाऱ्यांनी अजून तरी प्रतिक्रिया दिलेली नाही.
First published: