Home /News /sport /

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत 'या' खेळाडूंमुळे पराभव, मोहम्मद शमीचा थेट आरोप

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत 'या' खेळाडूंमुळे पराभव, मोहम्मद शमीचा थेट आरोप

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पराभवावर मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय टीमनं टेस्ट सीरिज 1-2, तर वन-डे सीरिज 0-3 या फरकानं गमावली

    मुंबई, 26 जानेवारी : टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पराभवावर मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय टीमनं टेस्ट सीरिज 1-2, तर वन-डे सीरिज 0-3 या फरकानं गमावली. शमी या दौऱ्यातील टेस्ट टीमचा सदस्य होता. त्याने टेस्टमधील पराभवावर वक्तव्य केले आहे. टीम इंडियानं पहिली टेस्ट जिंकून चांगली सुरूवात केली. पण, नंतरच्या दोन टेस्ट गमावल्या. या पराभवानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडली. मोहम्मद शमीनं या पराभवाबद्दल टीममधील बॅटरना जबाबदार धरलं आहे. 'टेलीग्राफ' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शमीनं सांगितलं की, 'आमची बॅटींग चांगली झाली नाही. या कारणामुळेच आम्हाला पराभव सहन करावा लागला. आमच्या बॉलर्सनं खूप चांगली कामगिरी केली हे विसरता कामा नये. ही एक सकारात्मक बाजू आहे. बॉलर्सनी कायम मॅचमध्ये संधी निर्माण केली,' असे शमीने सांगितले. टीम इंडियाने दक्षिण  आफ्रिकेला दुसऱ्या टेस्टमध्ये 240 तर तिसऱ्या टेस्टमध्ये 113 रनचे लक्ष्य दिले होते. हे दोन्ही टार्गेट आफ्रिकेनं 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केली. भारताने पहिली टेस्ट 113 रननं जिंकली होती. मोहम्मद शमी पुढे म्हणाला की, 'आमची बॅटींग यंदा थोडी खराब झालाी. आम्हाला त्याची किंमत मोजावी लागली. आमच्याकडे दोन्ही टेस्टमध्ये 50-60 रन अतरिक्त असते तर मॅच जिंकण्याची मोठी संधी होती. बॅटींगमधील कमतरचा लवकरच दूर होईल,' अशी आशा शमीनं व्यक्त केली आहे. कॅप्टनसी सोडल्यानंतर विराट कोहली बदलला का? रवी शास्त्रींनी दिलं उत्तर शमीनं बॅटिंगवर नाराजी व्यक्त करण्याचे कारणही ठोस आहे. केएल राहुलनं (KL Rahul) टेस्ट सीरिजमध्ये भारताकडून सर्वात जास्त 246 रन केले. त्यापैकी 123 रन त्याने पहिल्या इनिंगमध्येच केले होते. त्यानंतरच्या 5 इनिंगमगमध्ये त्यानं फक्त 123 रन काढले. भारताचा दुसरा ओपनर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याने देखील निराशा केली. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 60 रन काढले. त्यानंतर एकाही इनिंगमध्ये तो 30 पेक्षा जास्त रन करू शकला नाही. त्याने संपूर्ण सीरिजमध्ये फक्त 135 रन काढले. तर चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) 6 इनिंगमध्ये 124 तर अजिंक्य रहाणेनं 6 इनिंगमध्ये 136 रन केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa, Team india

    पुढील बातम्या