क्रिकेटमधलं वादळ शांत होणार, गेलची निवृत्ती

क्रिकेटमधलं वादळ शांत होणार, गेलची निवृत्ती

टी20त शतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि कसोटीत त्रिशतक करणारा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज

  • Share this:

किंगस्टन,17 फेब्रुवारी : वेस्टइंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने यावर्षी इंग्लंजमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहे.ख्रिस गेलच्या निवृत्तीची माहिती वेस्ट इंडीज क्रिकेटने ट्विटरवरून दिली.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या सरावापूर्वी गेलने ही घोषणा केली आहे. जर वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजला चांगली कामगिरी करता आली नाही आणि ते पुढच्या फेरीत पोहचले नाही तर 4 जुलै 2019 ला गेल निवृत्त होईल. अफगाणिस्तानविरुद्ध तो शेवटचा सामना खेळण्याची शक्यता आहे.

ख्रिस गेलचे बऱ्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं होतं. त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात घेतलं आहे. वेस्ट इंडिज संघासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतक करणारा गेल सर्वाधिक धावा करण्यात ब्रायन लारानंतर दुसरा फलंदाज आहे.

एकदिवसीय कारकिर्दीत ख्रिस गेलने 284 सामने जिंकले आहेत. त्याने 9 हजार 727 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने 23 शतके आणि 49 अर्धशतके केली आहेत. वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक 10 हजार 405 धावा केल्या आहेत. आपल्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गेलने 2015 च्या वर्ल्डकपमध्ये 215 धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडीजकडून ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

गेलने 1999 मध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्याने 103 कसोटी सामन्यात 7 हजार 214 धावा काढल्या आहेत. त्याने टी20 सामन्यात 1607 धावा केल्या आहेत. टी20त शतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि कसोटीत त्रिशतक करणारा ख्रिस गेल हा जगातील एकमेव फलंदाज आहे.

First published: February 18, 2019, 9:10 AM IST

ताज्या बातम्या