गेल नावाचं वादळ शमणार, भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणार निवृत्ती

वर्ल्ड कपनंतर होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेनंतर गेल निवृत्ती जाहीर करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 05:26 PM IST

गेल नावाचं वादळ शमणार, भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणार निवृत्ती

लंडन, 26 जून : वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज आणि युनिवर्सल बॉस या नावाने चर्चेत असलेला ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. याआधी गेलनं वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. याबाबत वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, वर्ल्ड कपनंतर होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेनंतर गेल निवृत्ती जाहीर करणार आहे.

39 वर्षांच्या गेलने 284 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गेलनं आपल्या कारकिर्दीत 37.12च्या सरासरीने 9727 धावांचा टप्पा गाठला आहे. यात 23 शतके आणि 49 अर्धशतकांच्या समावेश आहे. गेल हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळं ओळखला जातो. गेलनं 16 मार्च 2000 साली कसोटीमध्ये तर, 11 सप्टेंबर 1999मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

गेलच्या करिअरमधली सर्वश्रेष्ठ खेळी म्हणजे, 2015मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्यानं सर्वाधिक म्हणजे 215 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कपमधील ही पहिली दि्वशतकी खेळी होती. एवढेच नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक, एकदिवसीय सामन्यात दि्वशतक आणि आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शतक झळकावणारा गेल हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे. त्यानं 103 कसोटी आणि 56 टी-20 सामने खेळला आहेत.

Loading...

गेलचं वादळ आयपीएलमध्ये दिसणार नाही ?

आयपीएल आणि गेल असं समीकरण गेली काही वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलनं आपल्या फलंदाजीनं आयपीएल गाजवले आहे. गेलला टी-20 क्रिकेटचा बादशाह मानले जाते, त्यामुळं आयपीएलमध्ये गेल खेळणार आहे की नाही याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.

वाचा- IND vs WI : अरे चाललयं काय, भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळतचं नाहीये तर...

वाचा- सचिनला भारतीय संघात नको आहे शमी, हॅट्ट्रिक करूनही नाकारण्याचे 'हे' आहे कारण

वाचा- फलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या बुमराहच्या यॉर्कर मागचं 'हे' आहे रहस्य

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...