नवी दिल्ली, 11 जानेवारी : क्रिकेट या खेळाला फक्त भारतातच नव्हे तर जगातही तेवढेच चाहते आहेत. त्यामुळं क्रिकेटपटूंचे चाहतेही जगाच्या कानाकोपऱ्यात असतात. असाच एक दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेलचे चाहते सर्वच ठिकाणी आहेत. आपल्या फलंदाजीनं मैदान गाजवणारा गेल मैदानाबाहेर आपल्या लॅविश आयुष्यासाठी ओळखला जातो. असाच त्याचा एक अश्लिल डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या कॅरिबियन खेळाडूनं नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये तो पबमध्ये तरुणींसोबत नाचताना दिसत आहे. ख्रिस गेलने इन्स्टाग्रामवर जो डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, त्याला चाहत्यांकडून बऱ्याच प्रतिक्रिया मिळत आहेत. काहीजणांना हे जाणून घ्यायचे आहे की सध्या गेल कुठे आहे आणि हा डान्स व्हिडिओ कुठला आहे.
काहींनी हा व्हिडिओ ढाकाचा असल्याचे सांगितले, जेथे हा फलंदाज बांगलादेश प्रीमियर लीग मध्ये (बीपीएल) खेळत आहे. काही चाहत्यांनी म्हटले आहे की हा व्हिडिओ जमैकाचा आहे. ख्रिस गेल सध्या बांगलादेशात असून चॅटोग्राम चॅलेंजर्स संघाच्या वतीने बीपीएलमध्ये खेळत आहे. त्याने 7 जानेवारीला प्रथमच बीपीएलमध्ये भाग घेतला आणि राजशाही रॉयल्सविरुद्ध 10 चेंडूत 23 धावा केल्या ज्यामध्ये त्याने 3 षटकार ठोकले.
क्रिकेटच्या खेळपट्टीवर चमकदार कामगिरी करणार्या गेलला नेहमीच चर्चेत रहायला आवडते. रंगीबेरंगी मूडची गेल सोशल मीडियावर असे व्हिडिओ अपलोड करत आहे. गेलचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले आहे. त्यांच्यावर बर्याच वेळा टीकेचा सामना करावा लागला.