ख्रिस गेल नावाचं वादळ ; 69 चेंडूत 18 सिक्स आणि 146 नाबाद धावा !

ख्रिस गेल नावाचं वादळ ; 69 चेंडूत 18 सिक्स आणि 146 नाबाद धावा !

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ख्रिसने एका इनिंगमध्ये एक दोन नाही तर तब्बल १८ सिक्सर मारून ख्रिस गेलने त्याच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

  • Share this:

13 डिसेंबर : ख्रिस गेल म्हणजे टी-२० चा बादशाह. षटकार मारावे तर ख्रिस गेलनी आणि वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज फलंदाजानं सिक्सर मारण्याचा नवा रेकॉर्डच केला. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ख्रिसने एका इनिंगमध्ये एक दोन नाही तर तब्बल १८ सिक्सर मारून ख्रिस गेलने त्याच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

गेलने शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रंगपूर रायडर्स विरुद्ध खेळताना 69 चेंडूत 146 नाबाद धावा केल्या आणि टी-20 मध्ये एकूण 11056 धावांचा डोंगर रचला.

ख्रिस गेलनं केलेले आणखी काही रेकॉर्ड‌्स

- एका इनिंगमध्ये - १८ षटकार ठोकणारा पहिला फलंदाज

- टी-२०मध्ये आतापर्यंत ८१९ षटकार

- टी-२०मध्ये ११ हजार धावा करणारा पहिला फलंदाज

- टी-२०मध्ये २० शतकं करणारा पहिला फलंदाज

या सगळ्या विक्रमांचा डोंगर ख्रिस गेलनं रचला आहे.

खरं तर त्याच्या इतक्या सगळ्या रेकॉर्ड‌्समुळे टी -२० आणि ख्रिस गेल असं एक समीकरणच झाले आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमधला हा धमाका आता आयपीएलमध्येही बघायला मिळेल अशा अपेक्षा गेलचे फॅन्स करतायत.

First published: December 13, 2017, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading