IPL 2019 : जेव्हा गेल आणि चहल भिडतात तेव्हा...पाहा व्हिडिओ

IPL 2019 : जेव्हा गेल आणि चहल भिडतात तेव्हा...पाहा व्हिडिओ

पराभवांची ही मालिका खंडित करण्यासाठी विराटच्या सेनेला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.

  • Share this:

मोहाली, 13 एप्रिल : विराटच्या पराभवाची मालिका खंडित करण्याची बंगळुरूचा संघाची अपेक्षा गेलनं मातीत मिळवली. एका धावानं गेलचं शतक हुकलं असलं तरी, त्याच्या 99 धावांच्या जोरावर पंजाबनं 174 धावांपर्यंत मजल मारली.

दरम्यान, बंगळुरूनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण पंजाबच्या सलामीवीरांनी पहिल्या सहा षटकांमध्ये बळी न मिळवता 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर सातव्या षटकामध्ये विराट कोहलीने चहलच्या हाती चेंडूं सुपूर्द केला. चहल सातवे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळी चहल गोलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी लोकेश राहुल हा स्ट्राइकवर होता, तर गेल हा नाइट स्ट्राइकवर होता. त्यावेळी चहलने खेळपट्टीकडे पाहिले आणि हाताला माती लावली. त्यावेळी गेल आणि चहलमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. पण ती धक्काबुक्की नव्हती. कारण गेलने गमतीने चहलला ढकलल्याचे त्यानंतर निष्पन्न झाले.पण त्यानंतर गेलच्या अर्धशकतानंतर गेल आणि चहल एकमेकांना अलिंगण देतांना दिसलं. त्यामुळं मैदानात वैर असलं तरी, चहल आणि गेल यांच अनोखं बंधु प्रेम दिसलं.या सामन्यात कोहलीनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पंजाबकडून सलामीला आलेल्या केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर अखेर 66 धावानंतर चहललं राहुलला बाद करण्यात यश आले. त्यानंतर गेल वगळता कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान बंगळुरू संघानंही 175 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. पण पार्थिक पटेल 19 धावांवर बाद झाला. सध्या आपल्या पहिल्या विजयासाठी कर्णधार विराट कोहली आणि 360 फलंदाज एबी डिव्हिलियर्स प्रयत्न करत आहेत.VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 10:33 PM IST

ताज्या बातम्या