गेल संघातून बाहेर, पंजाबने केलं एप्रिल फूल?

खरंच, गेलला पंजाबने आजच्या सामन्यातून बाहेर बसवलं आहे का?

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 08:54 PM IST

गेल संघातून बाहेर, पंजाबने केलं एप्रिल फूल?

मोहाली, 01 एप्रिल : आयपीएलच्या या हंगामात दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पंजाबने त्यांच्या संघात मोठा बदल करत सर्वांनाच धक्का दिला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने युनिव्हर्सल बॉसला विश्रांती दिली आहे. संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे नाव नसल्याने चाहत्यांना हे एप्रिल फूल असल्याचेही वाटले. पण संघाची प्लेइंग इलेव्हनची यादी आली तेव्हा त्यातही गेलचे नाव नव्हते.स्फोटक फलंदाज ख्रिस गेल सामन्यात खेळणार नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्यांना किंग्ज इलेव्हनचा कर्णधार रविचंद्रन अश्विनच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेलला पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्याने विश्रांती देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.


Loading...


गेलसह अँड्र्यू टायलासुद्धा विश्रांती दिली आहे. दोघांच्या जागी सॅम करन आणि मुजीब रहमान यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.किंग्ज इलेव्हन पंजाब : लोकेश राहुल, मयंक अगरवाल, डेव्हिड मिलर, सर्फराज खान, मनदीप सिंग, हर्दुस विलजोन, सॅम करन, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, मुजीब रहमान


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...