Home /News /sport /

ऑस्‍ट्रेलियन महिला पत्रकारने असा घेतला Team India चा बदला, मायकल वॉनला दिलं प्रत्युत्तर

ऑस्‍ट्रेलियन महिला पत्रकारने असा घेतला Team India चा बदला, मायकल वॉनला दिलं प्रत्युत्तर

Michael Vaughan

Michael Vaughan

ऑस्ट्रेलियाच्या विजयाची चर्चा रंगली असतानाच ऑस्‍ट्रेलियन महिला पत्रकारने अतिउत्साहात भारतीय संघावर टीका करणाऱ्या मायकल वॉनला(Michael Vaughan) सडेतोड उत्तर दिले आहे.

    नवी दिल्ली, 28 डिसेंबर: ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका (Ashes Series) आपल्या नावावर केली आहे. कंगारुंच्या संघाने इंग्लंडला एक(Australia vs England) डाव आणि 14 धावांनी पराभूत केले. क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियाच्या विजयाची चर्चा रंगली असतानाच ऑस्‍ट्रेलियन महिला पत्रकार कोले अमांडा बेलीने (Cole Amanda Bailey ) अतिउत्साहात भारतीय संघावर टीका करणाऱ्या मायकल वॉनला(Michael Vaughan) सडेतोड उत्तर दिले आहे. खरतंर ही बाब दोन वर्षापूर्वीची आहे. 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या हॅमिल्टन वनडेमध्ये टीम इंडिया केवळ 92 धावा करू शकली होती. यानंतर वॉनने टीम इंडियाची खिल्ली उडवली होती. 'भारत 92 धावांवर ऑलआऊट. आजकाल कोणताही संघ 100 पेक्षा कमी धावा काढून बाद होईल यावर विश्वास बसत नाही.' असे त्याने ट्विट केले होते. आता ऑस्ट्रेलियन पत्रकाराने त्याच्या या ट्विटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. आणि मला बरोबर माहित असल्याचे म्हटले आहे. पहिल्या डावामध्ये इंग्लंडने 185 धावा केल्या. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 267 धावा करत 82 धावांची आघाडी मिळवली. त्यामुळेच हा सामना रंगतदार होईल असे वाटले होते. पण इंग्लंडला चारी मुंड्या चित करत ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस जिंकली. इंग्लंडचा दुसरा डाव 27.4 षटकांमध्ये 68 रनांमध्ये गुंडाळला. इंग्लंडच्या याच पराभावर बोट ठेवत कोले अमांडा बेलीने हे ट्वीट केले आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात भारतीय चाहते तिचे आभार मानत आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Ashes, Australia

    पुढील बातम्या