Home /News /sport /

क्रिकेटचा रोमांच आणखी वाढणार! चिपचा स्मार्ट बॉल मैदान गाजवणार

क्रिकेटचा रोमांच आणखी वाढणार! चिपचा स्मार्ट बॉल मैदान गाजवणार

क्रिकेटमध्ये होणार स्मार्ट बॉलचा वापर

क्रिकेटमध्ये होणार स्मार्ट बॉलचा वापर

क्रिकेटच्या मैदानात आता स्मार्ट बॉलचा (Smart Ball in Cricket) वापर होणार आहे. लीग क्रिकेटमध्ये हा बॉल वापरला जाणार आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट : क्रिकेटच्या तंत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. थर्ड अंपायरपासून ते कॅमेराचा वापर, हॉक आय, स्निको मीटर, हॉट स्पॉट, स्पायडर कॅम, स्पीड गन, स्टम्प माईक यांच्यासारखी अनेक उपकरणं हल्ली क्रिकेट सामन्यादरम्यान वापरली जात आहेत. आता क्रिकेट विश्वात आणखी एक प्रयोग होत आहे. क्रिकेटच्या मैदानात आता स्मार्ट बॉलचा (Smart Ball in Cricket) वापर होणार आहे. लीग क्रिकेटमध्ये हा बॉल वापरला जाणार आहे. यावर्षी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL-2021) अशाप्रकारचा बॉल पहिल्यांदाच वापरला जाईल. स्पोर्ट्स कंपनी स्पोर्टकोरने कूकाबुराच्या मदतीने हा बॉल तयार केला आहे. एखाद्या लीगमध्ये अशाप्रकारचा बॉल वापरण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. काय आहे स्मार्ट बॉल? स्मार्ट बॉल एक प्रकारचा इंटलिजंट बॉल असतो, ज्यात इलेक्ट्रॉनिक चिप बसवली असते. सेन्सर असलेली ही खास चिप रियल टाईम स्पीड, स्पिन, पॉवर याची माहिती एकत्र करते. ऍपच्या माध्यमातून स्मार्टवॉच, मोबाईल, टॅब किंवा कॉम्प्यूटर/लॅपटॉपवर ही माहिती बघता येऊ शकते. बॉलमध्ये चिप असली तरी त्याचा मैदानातला व्यवहार सामान्य असेल, तसंच बॉलचं वजनही वाढलेलं नाही, असं कंपनीने सांगितलं आहे. स्मार्ट बॉल स्पीड, स्पिन आणि पॉवरबाबत माहिती देईल. सध्या वापरात असलेला बॉल बॉलरच्या हातातून सुटताना आणि पिचवर पडण्याच्या आधीचा वेग रेकॉर्ज करतो, पण या स्मार्ट बॉलमुळे बॉलचा स्पिन आणि वेग पडल्यानंतरही कळणार आहे. ऑपरेटरने ऍपवर एक बटण दाबल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू होतं, यानंतर डेटा एकत्र व्हायला सुरुवात होते. हा डेटा खेळपट्टीच्या आत लावलेल्या राऊटरपर्यंत पोहोचेल आणि मग लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमधून माहिती मिळेल. बॉल फेकल्यानंतर परिणाम यायला जवळपास 5 सेकंदाचा वेळ लागतो.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या