मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अर्जुन तेंडुलकरची मुंबई रणजी टीममध्ये का निवड झाली? पाहा Inside Story

अर्जुन तेंडुलकरची मुंबई रणजी टीममध्ये का निवड झाली? पाहा Inside Story

सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरची (Arujun Tendulkar) मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीममध्ये (Mumbai Ranji Team) निवड झाली आहे. याआधी अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये होता.

सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरची (Arujun Tendulkar) मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीममध्ये (Mumbai Ranji Team) निवड झाली आहे. याआधी अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये होता.

सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरची (Arujun Tendulkar) मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीममध्ये (Mumbai Ranji Team) निवड झाली आहे. याआधी अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये होता.

मुंबई, 30 डिसेंबर : सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरची (Arujun Tendulkar) मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीममध्ये (Mumbai Ranji Team) निवड झाली आहे. याआधी अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये होता. आयपीएल 2021 (IPL 2021) च्या लिलावात मुंबईने (Mumbai Indians) अर्जुनला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं, पण त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता अर्जुनची भारताची सगळ्यात जुनी आणि सगळ्यात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये सगळ्यात यशस्वी मुंबई टीममध्ये संधी मिळाली आहे. सचिनच्या मुलाने अजून तरी उल्लेखनीय कामगिरी केली नसली, तरी मुंबईच्या निवड समितीला त्याने प्रभावित केलं आहे.

मुंबईच्या निवड समितीचे प्रमुख सलिल अंकोला (Salil Ankola) यांनी अर्जुनची मुंबईच्या टीममध्ये का निवड केली, याबाबत खुलासा केला आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सलिल अंकोला म्हणाले, 'अर्जुन चांगली बॉलिंग करत आहे, पण दुर्दैवाने त्याला दुखापत झाली, यानंतर खेळलेल्या सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. मुंबई क्रिकेटचं भविष्य पाहून आम्ही ही टीम निवडली आहे.'

'दुर्दैवाने आमचा फास्ट बॉलर तुषार देशपांडे याला दुखापत झाली आहे, पण या टीमकडून आम्हाला अपेक्षा आहेत. टीममध्ये काही अंडर-19 खेळाडू आणि काही अनुभव असलेले खेळाडू असं मिश्रण आहे,' असं अंकोला म्हणाले.

'कोरोना व्हायरसमुळे लाल बॉलचं क्रिकेट मागच्या वर्षी होऊ शकलं नाही, पण आम्ही सगळी क्षेत्र कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रिन्स बडियानीसारखे काही युवा खेळाडू आहेत, ज्यांनी अंडर-19मध्ये चांगली कामगिरी केली. आम्ही त्याला प्रोत्साहन देणार आहोत. मोठ्या मंचावर तो कशी कामगिरी करतो, हे आम्हाला पाहायचं आहे. अंडर-19 खेळाडूंनी सीनियर टीमपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे. भविष्यामध्ये हे खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे,' असं वक्तव्य अंकोला यांनी केलं.

रणजी ट्रॉफीसाठी मुंबईची टीम

पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (विकेटकीपर), हार्दिक तमोर (विकेटकीपर), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुश कोटियन, प्रशांत सोळंकी, शशांक अटारडे , धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बडियानी, सिद्धार्थ राऊत, रोयस्तान डायस, अर्जुन तेंडुलकर

First published:

Tags: Arjun Tendulkar, Mumbai, Sachin tendulkar