Home /News /sport /

IND vs SA: टीम इंडिया 29 वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार का? चेतेश्‍वर पुजाराने केली भविष्यवाणी

IND vs SA: टीम इंडिया 29 वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार का? चेतेश्‍वर पुजाराने केली भविष्यवाणी

Cheteshwar Pujara

Cheteshwar Pujara

दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान चेतेश्‍वर पुजाराने (Cheteshwar Pujara)पहिल्या टेस्ट सीरिजसंदर्भात भविष्यवाणी केली आहे.

    नवी दिल्ली, 19 डिसेंबर: भारताला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत (IND vs SA) एकदाही मालिका विजय मिळवता आलेला नाही. कॅप्टन कोहली 29 वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार का? असा सवाल क्रिकेट जगतात उपस्थित होत असतानाच चेतेश्‍वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने पहिल्या टेस्ट सीरिजसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाने घरच्या मैदानात न्यूझीलंडचा दारुण पराभव केला. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा उत्साह उंचावला आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून क्रिकेट प्रेमींच्या आशा वाढल्या आहेत. दरम्यान, चेतेश्‍वर पुजाराने बीसीसीआयशी संवाद साधला. यावेळी पुजाराने, अफ्रिका दौऱ्यापूर्वी आम्ही घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सीरीज खेळली आहे. त्यामुळे बहुतांश खेळाडू टेस्ट मॅचेसच्या टचमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही आम्हाला पुरेसा ब्रेक मिळाला, ज्यामध्ये संघाने चांगली तयारी केली आहे. या मालिकेकडून सर्व खेळाडूंना खूप अपेक्षा आहेत. दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. असे मत पुजाराने यावेळी व्यक्त केले. तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्याही वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज भारताच्या विजयाची सर्वात मोठी आशा आहेत. पुजारा म्हणाला, जेव्हाही आम्ही परदेशी भूमीवर खेळतो तेव्हा आमचे वेगवान गोलंदाज दोन्ही संघांमध्ये फरक निर्माण करतात. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेवर नजर टाकली तर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेत आमचे वेगवान गोलंदाज हे आमचे प्रमुख हत्यार असतील. पुजाराला आशा आहे की तो दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीशी जुळवून घेत कसोटीत 20 बळी घेऊ शकेल. तुमच्याकडे असे अप्रतिम गोलंदाज असतील तर तुम्ही सामना जिंकण्यास पात्र आहात. अशी भावना पुजाराने यावेळी व्यक्त केली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Pujara, South africa, Team india

    पुढील बातम्या