मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /द. आफ्रिकेत सीरीज विजयासाठी आम्ही सक्षम, कारण...Pujara ने व्यक्त केला प्रबळ विश्वास

द. आफ्रिकेत सीरीज विजयासाठी आम्ही सक्षम, कारण...Pujara ने व्यक्त केला प्रबळ विश्वास

Cheteshwar Pujara

Cheteshwar Pujara

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (India vs South Africa) 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.

नवी दिल्ली, 24 डिसेंबर: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (India vs South Africa) 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, मिडिल क्लास बॅट्समन चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने सीरीज विजयासंदर्भात प्रबळ विश्वास व्यक्त केला आहे.

दक्षिण आफ्रिकेत वेगवान गोलंदाजांना उपयुक्त खेळपट्ट्यांवर आमचे फलंदाज धावा काढण्यास सज्ज आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात येथे चांगली कामगिरी करेल, यात शंका नाही, असे मत पुजाराने एका व्हिडीओद्वारे व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सीरीज सुरु होण्यपूर्वी, पुजाराने टीम इंडियासंदर्भात प्रबळ विश्वास व्यक्त केला आहे. तो म्हणाला, अलीकडे विदेशात मिळविलेल्या विजयांमुळे भारताचा आत्मविश्वास वाढला असून याचा प्रभाव रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहायला मिळेल.

आपण विदेश दौरा करतो त्यावेळी खेळपट्ट्या वेगवान असतील आणि चेंडू अखेरच्या क्षणी वळणघेतील, हे डोक्यात असतेच. भारताबाहेर वेगवान माऱ्याला तोंड देणे नेहमी आव्हानात्मक मानले जाते. या संघाने मात्र सर्व गोष्टींवर मात केली. आमच्या संघात संतुलित फलंदाजी आहे. तयारी पाहता या दौऱ्यात आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास वाटत असल्याचे पुजाराने यावेळी सांगितले.

तसेच बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओत पुजारा म्हणाला, आमचे अनेक खेळाडू आधी येथे खेळले असून त्यांना अनुभव आहे. तयारीच्या वेळी आम्ही प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली.

अनेक संघ घरच्या खेळपट्ट्यांवर प्रभावी कामगिरी करतात. दक्षिण आफ्रिका याला अपवाद नाही. यजमान संघात सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची फळी आहे. त्यांचे आव्हान परतवून लावणे खडतर असेल. परंतु, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध मालिका विजयाचा भारताला लाभ होईल. विदेशात जिंकू शकतो, असा विश्वास भारतीय संघात संचारला. कुठल्याही स्थितीत आमचे युवा आणि अनुभवी खेळाडू चांगली कामगिरी बजावू शकतात. दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयासाठी आम्ही सक्षम आहोत. असा प्रबळ विश्वास पुजाराने यावेळी व्यक्त केला.

भारताने वर्षाच्या सुरुवातीला 4 मॅचच्या सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत करून भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. त्यानंतर त्याच्या भूमीवर झालेल्या चार सामन्यांत त्याने इंग्लंडविरुद्ध 2-1 अशी आघाडी घेतली होती. कोविड-19 संसर्गामुळे या 5 वी टेस्ट होऊ शकली नाही.

First published:

Tags: Pujara, South africa, Team india