मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Chetan Sharma Resigns : मोठी बातमी! BCCI चे चिफ सिलेक्टर चेतन शर्मा यांचा राजीनामा

Chetan Sharma Resigns : मोठी बातमी! BCCI चे चिफ सिलेक्टर चेतन शर्मा यांचा राजीनामा

बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 जानेवारी : बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये चेतन शर्मा यांनी बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघातील अनेक गोपनीय माहितीचा खुलासा केला होता. ज्यामुळे क्रिकेट विश्वात बरीच खळबळ उडाली होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला आहे.

चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काय होत?

चेतन शर्मा यांच्यावर  मंगळवारी एका टीव्ही चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान शर्मा यांनी अनेक खुलासे केले. यात शर्मा यांनी दावा केला की  "देशातील अव्वल क्रिकेटपटू पूर्णपणे तंदुरुस्त नसताना देखील फिटनेस सिद्ध करण्यासाठी इंजेक्शन घेतात". तसेच अनेक खेळाडू हे 80 ते 85 टक्केच फिट असताना इंजक्शन्स घेऊन व्यावसायिक क्रिकेटमध्ये लवकरात लवकर परतण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 हे ही वाचा  : IND VS AUS : आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना; ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशन दरम्यान बीसीसीआयमधील अनेक गोपनीय गोष्टींचा देखील खुलासा केला. टी20 वर्ल्डकप दरम्यान जसप्रीत बुमराहच्या पदार्पणाबाबत संघ व्यवस्थापन आणि त्यांच्यामधील झालेल्या मतभेदाचीही माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच जसप्रीत बुमराह अजूनही पूर्णपणे फिट झाला नसून तो ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका तसेच वनडे मालिकेला देखील मुकणार असल्याचे सांगितले.

चेतन शर्मा यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष यांच्यात इगो प्रॉब्लेम झाला असल्याचेही सांगितले.

शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलेल्या माहितीमुळे भारतीय संघाशी संबंधित गोपनीय निवड प्रकरणांची माहिती जगासमोर आली. यानंतर  स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्याने चेतन शर्मांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होत. बीसीसीआय या संबंधित खुलासा करून चेतन शर्मा यांना पदावरून दूर करेल याची शक्यता होतीच अखेर शर्मा यांनी आज आपला राजीनामा दिला आहे.

First published:
top videos

    Tags: BCCI, Breaking News, Cricket, Cricket news