IPL 2021: आज कोहली-धोनी आमनेसामने, चेन्नई कसा रोखणार बंगळुरूचा विजयी रथ?

IPL 2021: आज कोहली-धोनी आमनेसामने, चेन्नई कसा रोखणार बंगळुरूचा विजयी रथ?

आज रविवार असल्यानं IPL 2021 मध्ये 4 संघ आमनेसामने येतील. आजच्या दिवसातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal challengers Bangalore) यांच्यात खेळला जाईल. तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) दरम्यान खेळला जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : यंदा आयपीएलचा (IPL 2021) हंगाम जोरात सुरू असून चुरशीच्या लढतींमुळे चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन होत आहे. आज रविवार असल्यानं आयपीएलमध्ये चार संघ आमने-सामने असतील. आजच्या दिवसातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal challengers Bangalore) यांच्यात खेळला जाईल. तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) दरम्यान खेळला जाणार आहे.

आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. विराट कोहली आणि एमएस धोनी एकमेकां समोरा-समोर असतील. विशेष म्हणजे कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूने या हंगामात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळं खरं तर चेन्नईच्या संघावरच दबाव असणार आहे. बंगळुरूचा विजयी रथ रोखण्यात धोनी यशस्वी होतो का, की बंगळुरूचा संघ सलग पाचवा विजय मिळवणार, याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागून असणार आहे. गुणतालिकेमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या दोन्ही संघात भिडत होत असल्याने दमदार मुकाबल्याची चाहत्यांना अपेक्षा आहे. आत्तापर्यंत 4 पैकी 4 सामने जिंकून आरसीबी पहिल्या क्रमांकावर असून 4 पैकी 3 सामने जिंकून चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दुसरा सामना पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल विरूद्ध शेवटून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. आत्तापर्यंत दिल्लीचे अस्त्र ठरलेली गोलंदाजीच सनरायजर्स विरुद्ध प्रभावी ठरेल असे मानले जात आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतची फटकेबाजी आणि हैदराबादच्या राशिद खानच्या फिरकीकडे अनेकांचे लक्ष असेल, दोघांनी कमाल केल्यास सामना रंगतदार होईल. आपापल्या इंनिगवेळी खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल राहावी, यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार प्रार्थना करत असावेत, असे बोलेले जात आहे.

(हे वाचा - IPL 2021: सचिन तेंडुलकरच्या सल्ल्याचा CSK च्या बॉलरला फायदा! पाहा Video)

दरम्यान, काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचे 134 धावांचे आव्हान 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने संयमी आणि सेन्सेबल इनिंग खेळत 41 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. त्याला डेव्हिड मिलरने 24 धावा करत शेवटपर्यंत साथ दिली. शिवम दुबे आणि यशस्वी जैसवाल यांनीही प्रत्येकी 22 धावा करत राजस्थानच्या विजयात आपला हातभार लावला. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने 32 धावात 2 विकेट घेतल्या. राजस्थानने हंगामातील आपला दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत 4 गुणांसह सहावे स्थान मिळवले आहे. तर 5 पैकी 4 पराभव पदरात पडलेली केकेआर गुणतालिकेत तळाला पोहचली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 25, 2021, 9:33 AM IST

ताज्या बातम्या