Elec-widget

पुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक

पुण्यात वाॅटसनचा झंझावात, झळकावले शानदार शतक

. वाॅट्सनने 57 चेंडूत 6 षटकार, 9 चौकार लगावत 106 धावा कुटल्यात.

  • Share this:

पुणे, 20 एप्रिल : ख्रिस गेल पाठोपाठ आज पुण्यात शेन वाॅट्सनने आयपीएलच्या 11 व्या हंगामात दुसरे शतक झळकावले आहे. शेन वाॅट्सनने शानदार 106 धावांची खेळी केलीये.

पुण्यात स्पाॅट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षांनंतर परतलेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान राॅयल पहिल्यांदाच आमनेसामने आल्यात. राजस्थानने टाॅस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला.

चेन्नईने पहिले बॅटिंग करत 204 धावांचा डोंगर उभा केला. चेन्नईकडून शेन वाॅट्सनने धडाकेबाज शतक झळकावले. वाॅट्सनने 57 चेंडूत 6 षटकार, 9 चौकार लगावत 106 धावा कुटल्यात. तर सुरेश रैनाने 46 धावांची शानदार खेळी केली. निर्धारित 20 षटकार चेन्नईने 204 धावांचा डोंगर उभा केला. राजस्थान समोर आता विजयासाठी 205 धावांचं टार्गेट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 10:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...