IPL 2020च्या पर्पल कॅपचा विजेता ठरला! चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूनं KBCमध्ये केला दावा

आयपीएलआधीच ठरला पर्पल कॅपचा मानकरी. चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूचा खळबळजनक दावा.

News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2019 07:15 AM IST

IPL 2020च्या पर्पल कॅपचा विजेता ठरला! चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूनं KBCमध्ये केला दावा

चेन्नई, 27 ऑक्टोबर : आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ सर्वात चांगली कामगिरी करणारा संघ ठरला आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्तवेळा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आयपीएल 2020साठी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार असून एप्रिल-मे महिन्यात स्पर्धेला सुरुवात होऊ शकते.

मात्र आयपीएल 2020 स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच पर्पल कॅप कोण जिंकणार हे स्पष्ट झाले आहे. पर्पल कॅप हा पुरस्कार आयपीएमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिला जातो. यासाठी चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूनं दावा केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात आयपीएल संबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी आयपीएल 2019मध्ये पर्पल कॅपचा मानकरी कोण होता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी इमरान ताहिर, कागिसो रबाडा, दीपक चाहर आणि श्रेयस गोपाल असे पर्याय दिले होते.

वाचा-भारताचा आणखी एक स्टार खेळाडू होणार बाबा, ट्विटरवरून दिली Good News!

चेन्नई सुपर किंग्जचा स्पिनर इमरान ताहिरनं आयपीएल 2019मध्ये सर्वात जास्त विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं चेन्नई सुपरकिंग्सचा संघ मुंबई इंडियन्स विरोधात अंतिम सामन्यात पोहचला. अटीतटीच्या सामन्यात चेन्नईला एका धावानं सामना गमवावा लागला.

वाचा-पंजाबचा किंग युवराज सिंग झाला ‘मराठा’! या स्पर्धेत गाजवणार मैदान

Loading...

या आयपीएलमध्ये ताहिरनं 26 विकेट घेतल्या होत्या. तर, दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सच्या रबाडानं 25 आणि दीपक चहर 22 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. कौन बनेगा करोडपतीमध्ये हा प्रश्न विचारल्यानंतर दीपक चाहरनं यासह “2020मध्ये ऑप्शन सी म्हणजे स्वत: पर्पल कॅप जिंकू शकतो, असे सांगितले.

वाचा-पुढच्या IPLमध्ये जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स सोडणार? ‘या’ फोटोमुळं खळबळ

आयपीएल 2019मध्ये चाहर सर्वात जास्त विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला होता. त्यानं 17 सामन्यात 7.47च्या सरासरीनं धावा देत 22 विकेट घेतल्या होत्या. तर श्रेयस गोपालनं 20 आणि बुमराहनं 19 विकेट घेतल्या होत्या. खरतर अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा 11 सीझन कधी अमिताभ बच्चन यांच्यामुळे तर कधी या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांमुळे चर्चेत असतो. मात्र आता सध्या हा शो दीपक चाहरच्या या कमेंटमुळे चर्चेत आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: CSKipl
First Published: Oct 27, 2019 07:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...