अटीतटीच्या लढतीत चेन्नईचा कोलकातावर रोमहर्षक विजय

अटीतटीच्या लढतीत चेन्नईचा कोलकातावर रोमहर्षक विजय

कोलकाता नाईट रायडर्सने दिलेलं 202 धावांचं टार्गेट 205 धावा करून पूर्ण केलंय.

  • Share this:

10 एप्रिल : अत्यंत चुरशीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय मिळवलाय. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेलं 202 धावांचं टार्गेट 205 धावा करून पूर्ण केलंय.

आयपीएलच्या ११ व्या हंगामात पाचवा सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये रंगला.  नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केकेआरची सुरुवात खराब राहिली. 89 धावांवर केकेआरचा अर्धा संघ तंबूत परतला होता. पण  आंद्रे रसेलच्या झुंजार खेळीने कोलकाता नाइट रायडर्सने २०२ धावांचा डोंगर उभा केला. चेन्नई सुपरकिंग्ज 203 धावांचा पाठलाग करत असताना दमछाक झाली. शेन वाॅटसनने 42 तर अंबाती रायडूने 39 धावा करून विजयाचा पाया भरला. पण सॅम बिलिगन्स च्या 56 धावांच्या खेळीवर चेन्नईने विजय खेचून आणला.  अखेरच्या ओव्हरपर्यंत चेन्नईने झुंज दिली आणि ब्राव्हो आणि जडेजाने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

First published: April 11, 2018, 12:06 AM IST

ताज्या बातम्या