Home /News /sport /

IPL 2020 : CSK चा मोठा निर्णय : जखमी ब्राव्होच्या बदल्यात नवा खेळाडू घेणार नाही

IPL 2020 : CSK चा मोठा निर्णय : जखमी ब्राव्होच्या बदल्यात नवा खेळाडू घेणार नाही

IPL 2020 : ब्राव्होच्या (Dwayne Bravo) मांडीचे स्नायू ताणले गेल्याने तो 2 आठवड्यांसाठी आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

    चेन्नई, 19 ऑक्टोबर : IPL 2020 सुरू झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या संघामागे काही ना काही शुक्लकाष्ट लागलं आहे. Coronavirus मुळे सुरुवातीला दणका मिळाला, तर नंतर काही खेळाडूंनी न खेळण्याचा निर्णय घेतला. आता त्यांचा महत्त्वाचा ऑल राउंडर (all rounder) ड्वायन ब्राव्हो (Dwayne Bravo)  जखमी झाला. तो पुढचे दोन आठवडे खेळू शकणार नाही. पण त्याच्याऐवजी दुसरा खेळाडू चेन्नई खेळवणार नसल्याचं संघाच्या CEO ने स्पष्ट केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (DC) सामन्यामध्ये धोनीने ब्राव्होला गोलंदाजी न देता जडेजाला गोलंदाजी दिली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात ब्राव्होच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने तो 2 आठवड्यांसाठी आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पण चेन्नईच्या संघाने बदली खेळाडूची मागणी केली नसल्याचे संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितलं. याविषयी ANIला माहिती देताना विश्वनाथ यांनी सांगितले, 'आज आम्हाला त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. तो 2 आठवडे खेळू शकणार नाही. पण आम्ही त्याच्या बदली खेळाडू मागितलेला नसून फक्त काही दिवस आणि काही सामन्यांचा प्रश्न आहे. स्पर्धेच्या या टप्यावर बदली खेळाडू घेणे योग्य ठरणार नाही.' कोरोनाच्या कडक नियमांमुळे बदली खेळाडू संघात येण्यासाठी तितकाच कालावधी लागू शकतो. ब्राव्होची जखम फार मोठी नसेल अशी आशा आम्हाला असून तो स्पर्धेबाहेर जाणार नाही. त्याचबरोबर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात जडेजाला शेवटची ओव्हर देण्याच्या निर्णयावर बोलताना धोनीने ब्रावो फिट नसल्याचे सांगितले. शेवटची ओव्हर तोच टाकणार होता. पण तो जखमी झाल्यामुळे जडेजा आणि कर्ण शर्मा या दोघांपैकी मी जडेजाला ओव्हर देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी देखील आम्ही ब्राव्होलाच शेवटची ओव्हर देणार होतो, असं म्हटलं. पण तो जखमी झाल्यामुळे जडेजाला ओव्हर द्यावी लागली. ब्राव्हो डेथ ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करतो. त्याने अनेकदा संघाला सामने जिंकून देखील दिले आहेत. पण काहीवेळा प्रयत्न फसतात. पण आम्ही कष्ट करत असून खेळाडू देखील सराव करत आहेत, असंही फ्लेमिंग यांनी सांगितलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या