• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • RCB vs CSK Live : टॉसच्या आधीच धुळीचं वादळ! चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजीचा निर्णय

RCB vs CSK Live : टॉसच्या आधीच धुळीचं वादळ! चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजीचा निर्णय

कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या संघातील चुरस क्रीडा प्रेमींना पाहायला मिळणार आहे. सामन्यासाठी निर्धारित वेळेत होणारी नाणेफेक 10 मिनिटे पुढे ढकलण्यात आली होती.

  • Share this:
    शारजा, 24 सप्टेंबर : आयपीएलच्या रणसंग्रामात आज रॉयल चँलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या संघातील चुरस क्रीडा प्रेमींना पाहायला मिळणार आहे. सामन्यासाठी निर्धारित वेळेत होणारी नाणेफेक 10 मिनिटे पुढे ढकलण्यात आली  होती. शारजामध्ये धुळीच्या वादळामुळे नाणेफेकीला काहीसा वेळ लागला. टीम इंडियाच्या आजी आणि माजी कॅप्टनमधील या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय. विशेषत: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध झालेल्या पराभवानंतर आरसीबीसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. या लढतीसाठी आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) जय्यत तयारी केली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) टीमनं आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात (IPL 2021 Phase 1) दमदार कामगिरी केली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्यांची खराब सुरूवात झाली आहे. केकेआर विरुद्ध आरसीबीचा 9 विकेट्सनं मोठा पराभव झाला. आता आरसीबीला हा पराभव विसरुन चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शारजामध्ये होणाऱ्या लढतीत (RCB vs CSK) उतरावं लागणार आहे. महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नईची टीम सध्या दमदार फॉर्मात आहे. संघ असे - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, टीम डेव्हिड, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल हे वाचा - अखेर Team India चा पराभव! शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांची बाजी चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवुड
    Published by:News18 Desk
    First published: