मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: ...म्हणून CSK च्या चाहत्यांनी मानले देवाचे आभार!

IPL 2021: ...म्हणून CSK च्या चाहत्यांनी मानले देवाचे आभार!

IPL 2021: गुरवारी झालेल्या लिलावादरम्यान चेन्नईच्या (CSK) चाहत्यांनी एका माजी खेळाडूला ट्रोल करत देवाचे आभार मानल्याचं पहायला मिळालं.

IPL 2021: गुरवारी झालेल्या लिलावादरम्यान चेन्नईच्या (CSK) चाहत्यांनी एका माजी खेळाडूला ट्रोल करत देवाचे आभार मानल्याचं पहायला मिळालं.

IPL 2021: गुरवारी झालेल्या लिलावादरम्यान चेन्नईच्या (CSK) चाहत्यांनी एका माजी खेळाडूला ट्रोल करत देवाचे आभार मानल्याचं पहायला मिळालं.

चेन्नई, 19 फेब्रुवारी: इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL) 14 व्या सीजनच्या लिलावाची प्रक्रिया गुरूवारी चेन्नई येथे पार पडली. अनेक खेळाडूंवर मोठी बोली लावून संघांनी त्यांना विकत घेतलं. लिलावाच्या पहिल्या फेरीच्या वेळी मात्र चेन्नई सुपर किंग्जचे चाहते देवाचे आभार व्यक्त करताना दिसून आले. कारण यावर्षी चेन्नईने केदार जाधव (Kedar Jadhav) वर बोली लावण टाळलं.

चेन्नई सुपर किंग्ज हा मागच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफ मधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला होता. काही सामने तर अगदी थोड्या फरकाने या संघाने गमावले होते. आणि यापैकी काही सामन्यातील पराभव हा केदार जाधवच्या संथ खेळीमुळे झाल्याचं पहायला मिळालं होतं. केदार जाधववर त्याच्या संथ खेळीसाठी सोशल मीडियावर चाहत्यांकडून टीकेची झोड देखील उठवली गेली होती. आणि T-20 मध्ये अशा प्रकारची खेळी योग्य नसल्याचं चाहत्यांचं म्हणणं होत. याचाच परिणाम काल लिलाव प्रक्रियेवर पहायला मिळाला.

आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर केदार अनसोल्ड खेळाडू ठरल्याचं ट्विट करण्यात आल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट करत आपल्या संघाने बोली न लावल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

एका चाहत्याने लिहिलंय, ‘देवाचे आभार!’

तर अजून एका चाहत्याने लिहिलंय की, ‘ जर 1 लाख बेस प्राईज असती, तर काहीतरी होऊ शकलं असत.’

अजून एका चाहत्याने सुद्धा त्याच्या बेस प्राईज वरून बोलताना लिहिलंय की, ‘ 20 लाखांची वस्तू 2 कोटींना विकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा.’

खूप साऱ्या CSK फॅन्सनी गमतीशीर कमेंट करत केदार जाधवला ट्रोल केलं आहे.

लिलावाच्या पहिल्या फेरीत केदार जाधववर कोणत्याच संघाने बोली न लावल्याने त्याचा समावेश अनसोल्ड प्लेयर्सच्या यादीत करण्यात आला होता. नंतर मात्र वेगवान फेरीत सनरायझर्स हैदराबादने त्याला 2 कोटीमध्ये विकत घेतले.

First published:
top videos

    Tags: Chennai, Csk, IPL 2021, Ipl 2021 auction