S M L

VIDEO : मुंबईच्या विजयानंतर धोनीच्या चाहत्यांना बसला जबर झटका, असा काढला राग

अंतिम सामन्यात चेन्नईनं हातचा सामना गमावल्यानंतर सोशल मीडियावर लहान मुलांचे रडतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 12:46 PM IST

VIDEO :  मुंबईच्या विजयानंतर धोनीच्या चाहत्यांना बसला जबर झटका, असा काढला राग

चेन्नई, 14 मे : चेन्नईला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या षटकात मुंबईने एका धावेनं विजय साजरा केला. मुंबईने दिलेलं 150 धावांचं आव्हान चेन्नई सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने सामन्यावर पकड मिळवली. धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईचे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने टिच्चून गोलंदाजी केली. याच षटकात शेन वॉटसन धावबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करत मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला. याबरोबरच मुंबईनं इतिहास घडवला आणि सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं.

धोनीच्या संघानं अगदी एका धावानं सामना गमावला. मात्र हा पराभव चेन्नईच्या चाहत्यांना काही पचेनासा झाला आहे. एवढचं नाही तर, चेन्नईच्या पराभवामुळं चिमुकल्यांनाही आपलं रडु आवरता येत नाही आहे.अंतिम सामन्यात चेन्नईनं हातचा सामना गमावल्यानंतर सोशल मीडियावर लहान मुलांचे रडतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.चेन्नई आणि मुंबई हे दोन्ही संघ म्हणजे आयपीएलमधले सर्वात यशस्वी संघ, त्यामुळं जगभरात त्यांचे चाहते आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे, मात्र ही मुलं धोनीच्या पराभवामुळं ही लहान मुलं हिरमुसली आहेत. त्याचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

वाचा- IPL 2019: गुडघ्यातून रक्तस्राव सुरू असतानाही तो धोनीसाठी मैदानात लढत होता


धोनीच्या या तीन चुका पडल्या महागात

आयपीएलच्या 12 व्या हंगामात शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने चेन्नईला पराभूत करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहरच्या गोलंदाजीनंतर लसिथ मलिंगाने टाकलेल्या निर्णायक षटकाने सामना रोमहर्षक झाला. चेन्नईच्या फलंदाजांना जीवदान मिळालं मात्र, त्याचा फायदा त्यांना घेतला आला नाही. तसेच सामन्यात केलेल्या तीन चुका त्यांना महागात पडल्या. यामुळे अवघ्या एका धावेनं विजेतेपदानं त्यांना हुलकावणी दिली.

पहिली चूक : वॉटसन नको म्हणत असताना रैनाने डीआरएसचा निर्णय घेतला. चाहरने टाकलेल्या 10 व्या षटकात रैनाला पायचित केलं होतं. तेव्हा वॉटसनने रैना बाद असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे डीआरएसची एक संधी चेन्नईने गमावली.

दुसरी चूक : मुंबईकडून सर्वात कमी धावा दिल्या त्या हार्दिक पांड्याने. त्याने एका षटकात फक्त तीन धावा दिल्या. एवढंच नाही तर या षटकात धोनी धावबाद झाला. ओव्हर थ्रोवर धाव घेण्याची धोनीची चूक चेन्नईला महागात पडली.

तीसरी चूक : सामन्याच्या शेवटच्या षटकात 9 धावा पाहिजे होत्या. तेव्हा क्रीजवर असलेल्या वॉटसन आणि जडेजासाठी या धावा जास्त नव्हत्या. मात्र, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या नादात वॉटसन बाद झाला. तिथंच सामन्यात मुंबईने कमबॅक केलं.

वाचा- World Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनोखी लढत, 'हे' आकडे वाचून व्हाल थक्क


VIDEO: सिंधुदुर्गातील दोन गावांमध्ये 6 हत्तींचा धुमाकूळ, ग्रामस्थांमध्ये भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2019 12:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close