'धोनी ब्रिगेड' 'विराट सेने'वर भारी, चेन्नई पहिल्या स्थानावर !

'धोनी ब्रिगेड' 'विराट सेने'वर भारी, चेन्नई पहिल्या स्थानावर !

  • Share this:

मुंबई, 05 मे : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजाच्या धडाकेबाज कामगिरीच्या बळावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. या विजयासह चेन्नईने पहिल्या स्थानावर झेप घेतलीये.

चेन्नई टाॅस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजाची कॅप्टनकूल धोणीचा निर्णय सार्थ ठरवला. आरसीबीला 20 षटकात 127 धावात गुंडाळलं. आरसीबीकडून पार्थिव पटेलने एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावलं. त्याने सर्वाधिक 53 धावा केल्यात .तर आठव्या स्थानावर खेळण्यासाठी ालेल्या साउदीने 36 धावा केल्यात. या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 गडी तर हरभजन सिंगने 2 गडी बाद केले.

128 धावांचं माफक आव्हान चेन्नईने सहज पार केलं खरं पण सुरुवातील ओपनिंग जोडी शेन वाॅटसन 11 आणि सुरेश रैना 25 धावा करून बाद झाले. तर अंबाती रायडू 32 धावा करून बाद झाला. त्यांतर कर्णधार महेंद्र सिंग धोणीने तडाखेबाज खेळी करत 31 धावा कुटल्या आणि टीमला विजय मिळवून दिला. चेन्नई 18 षटकातच 128 धावा करून आरसीबीवर विजय मिळवला.

First published: May 5, 2018, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading