S M L

अटीतटीच्या लढतीत चेन्नईचा दिल्लीवर विजय

Sachin Salve | Updated On: May 1, 2018 12:01 AM IST

अटीतटीच्या लढतीत चेन्नईचा दिल्लीवर विजय

30 एप्रिल : दिल्ली डेअरडेव्हिल्सने दिलेली कडवी झुंज अखेर अपयशी ठरली. चेन्नई सुपर किग्सने 13 धावांनी दिल्लीचा पराभव केलाय.

चेन्नईने पहिली बॅटिंग करत 211 धावांचा डोंगर उभा केला. शेन वाॅट्सनने सर्वाधिक 78 धावा केल्या. तर धोनीने 51, अंबाती रायडू 41 आणि फा ड्यु प्लिसीस 33 धावा केल्या.  दिल्लीसमोर सामना जिंकण्यासाठी २१२ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र ते गाठणं दिल्लीच्या टीमला शक्य झालं नाही. दिल्लीने आक्रमक सुरुवात केली. पण चेन्नईने ओपनिंग जोडी फोडली. रिषभ पंतने सर्वाधिक ७९ धावा आणि आणि विजय शंकरने ५४ धावा केल्यात. पण दोघांची झुंज अपयशी ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2018 12:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close