VIDEO : ऑन युअर मार्क गेट सेट गो...चेपॉकवर धोनीची यांच्यासोबत रेस

VIDEO : ऑन युअर मार्क गेट सेट गो...चेपॉकवर धोनीची यांच्यासोबत रेस

चेन्नईचा संघ सध्या अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

चेन्नई, 07 एप्रिल : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं पुन्हा विजयीपथावर येत पंजाबचा पराभव केला. यामुळं सध्या मनोबल वाढलेल्या या संघातील खेळाडू सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. पण पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी मधला लहान मुलगा सगळ्यांना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सामन्यानंतर चेन्नईचा प्रमुख गोलंदाज इमरान ताहीर आणि सलामी फलंदाज शेन वॉटसन यांच्या मुलांसोबत धोनी खेळताना दिसला. यावेळी ज्यु. ताहीर आणि ज्यु. वॉटसन एकमेकांसोबत रेस करत असताना, यात धोनीही मैदानात उतरला. यावेळी धोनी एकदम लहान खेळण्याच्या मुडमध्ये दिसला. त्यानंतर धोनीनं ताहीरच्या मुलाला उचलुन घेतलं आणि फिनिशिंग लाईनपर्यंत धावत गेला.

चेन्नई संघाच्या ट्विटरवरुन गा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. या व्हिडिओत धोनी समवेत इमरान ताहिर आणि वॉटसनही मस्करीच्या मुडमध्ये दिसले. दरम्यान ताहिरला प्रशस्ती एक्सप्रेस या नावानं ओळखले जाते. त्यामुळं त्याच्या मुलालाही ज्युनिअर प्रशस्ती एक्सप्रेस असं बोललं जात. चेन्नईचा संघ सध्या अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

First published: April 7, 2019, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading