मुंबई, 8 डिसेंबर: नुकतीचं टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ)यांच्यात 2 मॅचची सिरीज पार पडली. या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने धूळ चारत सिरीज आपल्या नावावर केली. या विजयाची क्रिकेट जगतात चर्चा सुरु असतानाच दरम्यान सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमधील मोहम्मद सिरीजच्या (Mohammed Siraj) भूमिकेने सर्व भारतीयांची मनं जिंकली आहेत.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी करत न्यूझीलंडचा मुख्य क्रम उध्वस्त केला होता. त्यानंतर भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंड संघाचा डाव 62 धावांवर संपुष्टात आणला होता.
हा सामना संपल्यानंतर सर्व फॅन्स मोहम्मद सिराजला चिअर अप करताना दिसले. त्यानंतर मोहम्मद सिराजने फॅन्सकडे पाहत फ्लायिंग किस देण्याचा इशारा केला आहे. त्याचा इशारा पाहून फॅन्स ‘आरसीबी…आरसीबी’ अशा घोषणेसह जल्लोष करताना दिसून आले. मात्र, फॅन्सची ही भूमिका मोहम्मदला आवडली नाही.
இன்னோரு டைம் தலைவனோட ஸ்டுடன்ட்னு நிருபிச்சிட்ட @mdsirajofficial மாம்ஸ் ❤️💥 Siraj telling crowd to cheer for India and not Rcb. pic.twitter.com/wY8qKKih2f
— Ꭺяαν🔥 (@Araviee_offl) December 7, 2021
त्याने थेट भारतीय जर्सीकडे बोट दाखवले आणि भारतीय संघाला चीयर करण्यास(Cheer for India, not RCB) सांगितले. त्याची ही भूमिका भारतीयांच्या मनात ठाण मांडून गेली. त्याच्या या इशाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच चाहते त्याचे कौतुक देखील करत आहेत.
भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 540 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या 167 धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने 372 धावांनी आपल्या नावावर केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india