हॅमिल्टन, 26 नोव्हेंबर: ऑकलंडमध्ये 300 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडूनही टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धची पहिली वन डे गमवावी लागली. त्यामुळे हॅमिल्टनच्या दुसऱ्या वन डेत टीम इंडियासमोर करो या मरोची परिस्थिती आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. म्हणूनच उद्याची वन डे जिंकणं शिखर धवन अँड कंपनीसाठी गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्या मॅचमध्ये खेळवण्यात आलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. खासकरुन महागड्या गोलंदाजांना विश्रांती देऊन नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
'ते' व्हिलन टीमबाहेर
पहिल्या वन डेत टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरली ती भारतीय गोलंदाजी. विल्यमसन आणि टॉम लॅथमची भक्कम तटबंदी भारतीय गोलंदाजांना भेदता आली नाही. ऑकलंडच्या मैदानात याच गोलंदाजांसमोर न्यूझीलंडनं धावांची लूट केली आणि 307 धावांचं आव्हान सहजपणे पार केलं. या सामन्यात अर्शदीप सिंग सर्वात महागडा गोलंदाज ठरला. वन डे पदार्पण करणाऱ्या अर्शदीपनं एकही विकेट न घेता 68 धावा दिल्या होत्या. त्यानंतर शार्दूल ठाकूर आणि अनुभवी युजवेंद्र चहललाही चांगलाच मार पडला. त्यामुळे यापैकी काहीजणांना बसवून राखीव खेळडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Gujrat Election: दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यातून माघार, पण टीम इंडियाचा हा क्रिकेटर बायकोसाठी करतोय 'हे' काम
टीम इंडिया ऑकलंडमध्ये दाखल
दरम्यान या निर्णायक वन डेसाठी भारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल झाला आहे. बीसीसीआयनं टीम इंडियाचे खेळाडू ऑकलंडमध्ये पोहोचल्याचा एक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. रविवारी सकाळी भारत आणि न्यूझीलंडमध्ये ही दुसरी वन डे होणार आहे.
Hello from Hamilton 👋📍#TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/AHskNav1Vm
— BCCI (@BCCI) November 26, 2022
हेही वाचा - FIFA WC 2022: रोनाल्डोच्या आयुष्याचे 5 नियम... म्हणून दारु, सिगरेट आणि टॅटूपासून दूर आहे हा स्टार फुटबॉलर!
भारत वि. न्यूझीलंड, दुसरी वन डे
सेडॉन पार्क, हॅमिल्टन
भारतीय वेळेनुसार सकाळी 7.00 वाजता
अॅमेझॉन प्राईमवर थेट प्रक्षेपण
भारताचा वन डे संघ - शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, अर्शदीप, शार्दूल ठाकूर, दीपक चहर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports