नवी दिल्ली, 4 एप्रिल : देशातील पहिली महिला क्रिकेट कॉमेंट्रिटर चंद्रा नायडू यांचं रविवारी निधन झालं. चंद्रा नायडू भारतीय क्रिकेट टीमच्या पहिल्या कर्णधार कर्नल सी.के. नायडू यांच्या कन्या होत्या. चंद्रा नायडू या इंग्रजीतील निवृत्त प्राध्यापक होत्या. चंद्रा नायडू यांनी आपले वडील सी.के. नायडू यांच्यावर पुस्तकही लिहिलं होतं. ज्याचं शीर्षक अ डॉटर रिमेम्बर्स होतं.
तसं पाहता आपल्या देशात महिला कॉमेंट्रेटरचं प्रमाण अत्यल्प आहे. अशातच चंद्रा नायडू या देशातील पहिल्या महिला क्रिकेट काॅमेंट्रेटर म्हणून ओळखल्या जातात. (Chandra Naidu the countrys first female cricket commentator has no more )
अनेकदा महिलांना क्रिकेटमध्ये फार रुजी नसल्याचं सर्वसाधारणपणे पाहायला मिळतं.
सी.के नायडू हे क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. नायडू यांच्या नावावर आजही क्रिकेटरांना अनेक पुरस्कार दिले जातात. त्यांची कन्या चंद्रा नायडू यांनीही क्रिकेटमध्ये रुजी होती. त्यातूनही त्यांनी कॉमेंट्री सुरू केली व त्या देशातील पहिल्या महिला क्रिकेट कॉमेंट्रिटर म्हणून ओळखल्या जातात.
बातमी अपडेट होत आहे...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news