06 मे : मोठ्या विश्रांतीनंतर अखेर चॅम्पियन्स ट्रॅाफीसाठी भारतीय क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आलीये. जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या स्पर्धेत टीम इंडिया सहभागी होणार आहे.
बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सीके खन्ना यांनी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय टीमची सोमवारी घोषणा करण्यात येणार अशी माहिती दिलीये. उद्या 7 मे रोजी रविवारी दिल्लीत बीसीसीआय आणि एसजीएमची बैठक होणार आहे. त्यानंतर सोमवारी 8 मे रोजी टीमची घोषणा करण्यात येईल.
खरंतर आयसीसीच्या नव्या आर्थिक धोरणामुळे बीसीसीआय नाराज आहे. त्यामुळेच बीसीसीआय आपली नाराजी दाखवण्यासाठी भारताच्या टीमला पाठवणार नव्हती. जशी जशी टीम तारखेची तारीख जवळ येऊ लागल्यामुळे याला अधिक बळ मिळू लागले.
पण सुप्रीम कोर्टाद्वारे स्थापन केलेल्या समितीकडून चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय टीम जाहीर करण्याचे आदेश बीसीसीआयला देण्यात आले. याबद्दल तसा मेल पाठवण्यात आला. त्यानंतर सूत्र हलली आणि उद्या रविवारी बीसीसीआय आणि एसजीएमची बैठक बोलावलीये. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय टीम खेळणार हे जवळपास आता स्पष्ट झालंय.