India vs Pakistan Highlight : पाकच्या 3 खेळाडूंनी कुटल्या 230 धावा

India vs Pakistan Highlight : पाकच्या 3 खेळाडूंनी कुटल्या 230 धावा

फखर जमानचं शतक आणि अजहर अली, मोहम्मद हाफीजच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पाकने निर्धारीत 50 ओव्हर्समध्ये 338 रन्स केले.

  • Share this:

18 जून : भारतीय बाॅलर्सची धुलाई करत पाकिस्तानने 338 रन्सचा डोंगर उभा केला. फखर जमानचं शतक आणि अजहर अली, मोहम्मद हाफीजच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पाकने निर्धारीत 50 ओव्हर्समध्ये 338 रन्स केले. फखर जमान आणि अजहर अली, मोहम्मद हाफीज या तिघांनी पाकच्या स्कोअरपेक्षा 230 रन्स केले.

भारताने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगचं आमंत्रण दिलं. पाकिस्तानची सुरुवात शानदार राहिली. अजहर अली आणि फखर जमानने भारतीय गोलंदाजी चांगलीच धुलाई केली. 125 रन्सपर्यंत पाकची एकही विकेट गेली नाही. भारताचे भरवश्याचे गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि आर.अश्विनच्या ओव्हरर्स सगळ्यात महागड्या ठरल्यात. आर.आश्विनने 10 ओव्हर्समध्ये 70 रन्स दिले. तर जसप्रीत बुमराने 9 ओव्हर्समध्ये 68 रन्स दिले. विकेट पडत नसल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचे ढग जमा झाले होते.

मात्र, 59 रन्सवर जसप्रीत बुमराने अजहर अलीला आऊट करून पहिलं यश मिळवून दिलं. पण त्यानंतर फखरची फटकेबाजी सुरूच होती. 106 बाॅल्समध्ये त्याने 114 रन्स केले. यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. बाबर आझमने फखरची चांगली साथ दिली. अखेर 34 व्या ओव्हरमध्ये फखर आऊट झाला. फखर आऊट झाल्यानंतर स्कोअर आटोक्यात येईल अशी शक्यता होती.

पण असं झालं नाही बाबर आझमने फटकेबाजी करत 46 रन्स केले आणि आपल्या टीमला 250 पार नेलं. त्यापुर्वी शोयब मलिक 12 रन्सवर स्वस्तात आऊट झाला. बाबर आऊट झाल्यानंतर मोहम्मद हाफीजने तडाखेबाज बॅटिंग करत अर्धशतक पूर्ण केलं. 57 रन्सची नाबाद खेळी करत आपल्या टीमला 300 चा टप्पा पार करून दिला. त्याला इमाद वसीमने चांगली साथ दिली. त्यानेही 21 बाॅल्समध्ये 25 रन्स केले. भारतीय गोलंदाज पाक टीमला रोखण्यास अपयशी ठरले. त्यामुळे पाकने 338 रन्सचा टप्पा गाठला. आता भारताची बारी...

First published: June 18, 2017, 7:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading