Champions League : लिव्हरपूलची ऐतिहासिक कामगिरी, मेसीही ठरला फेल

लिव्हरपूलनं नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याची कामगिरी केली आहे.

  • Share this:

लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत बार्सिलोनाला नमवतं अंतिम फेरीत धडक मारली. लिव्हरपूलनं नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याची कामगिरी केली आहे.

याआधी चॅम्पियन लीगमध्ये रेयाल माद्रिदने 16 वेळा, एसी मिलानने 11 वेळा तर बायर्न म्युनिकने 10 वेळा अंतिम फेरी गाठण्याची किमया केली होती.

दरम्यान कोणत्याही 2 चॅम्पियन्स लीगमध्ये दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारा लिव्हरपूलचा संघ हा हा दुसरा इंग्लिश संघ ठरला आहे. याआधी 2008 आणि 2009मध्ये अशी कामगिरी मँचेस्टर युनायटेडनं केली होती.

सेमीफायनच्या पहिल्या लीगमध्ये बार्सिलोनानं लिव्हरपूलवर 3-0 अशी मात केली होती. दरम्यान, पिछाडीवर गेल्यानंतरही एखाद्या संघाने आगेकूच करण्याची चॅम्पियन लीगमधली ही चौथी वेळ आहे. तर, आघाडी घेऊनही पराभूत होणाऱ्या संघांमध्ये बार्सिलोनाची ही तिसरी वेळ आहे.

चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाने धडक मारलेल्या गेल्या 4 सेमीफायनलमध्ये तिसऱ्यांदा त्यांच्यावर पराभूत होण्याची नामुष्की ओढवली आहे. २००५ मध्ये त्यांनी अखेरचे जेतेपद पटकावले होते. दरम्यान या सामन्यात मेसीकडून सर्वांना अपेक्षा होत्या. मात्र मेसी हा पराभव टाळू शकला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या