कोरोनामुळे राष्ट्रीय खेळाडूंवर भाजी विकण्याची वेळ, केंद्र सरकारकडून 5 लाखांची मदत

कोरोनामुळे राष्ट्रीय खेळाडूंवर भाजी विकण्याची वेळ, केंद्र सरकारकडून 5 लाखांची मदत

कोरोनामुळे भारताच्या दोन राष्ट्रीय खेळाडूंना रस्त्यांवर भाजी विकण्याची वेळ आली आहे. वडिलांची नोकरी गेल्यानंतर राष्ट्रीय खेळाडू असलेल्या या दोन भावांना भाजी विकावी लागत आहे.

  • Share this:

मेरठ, 8 ऑक्टोबर : कोरोनाच्या या संकट काळात सगळ्यांनाच मोठा फटका बसला आहे. सामान्य व्यक्तीपासून ते उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना देखील कोरोनामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या काळात अनेकांचा रोजगार गेल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार झाले आहेत. याचा फटका भारतातील खेळाडूंना देखील बसला आहे. कोरोनामुळे भारताच्या दोन राष्ट्रीय खेळाडूंना रस्त्यांवर भाजी विकण्याची वेळ आली आहे. वडिलांची नोकरी गेल्यानंतर राष्ट्रीय खेळाडू असलेल्या या दोन भावांना भाजी विकावी लागत आहे.

तिरंदाज नीरज चौहान आणि बॉक्सर सुनील चौहान अशी या दोन भावांची नावं आहेत. हे दोघं भाजी विकत असल्याचं समोर आल्यानंतर आता केंद्र सरकारच्या वतीने या दोघांना 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी न्यूज 18 ने या संदर्भात एक बातमी दिली होती. त्यांनतर केंद्र सरकारला याबाबतची माहिती मिळाली, आणि मग या दोघांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

दीनदयाळ उपाध्याय फंडामधून या दोन खेळाडूंना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती रिजिजू यांनी ट्विट करून दिली आहे. या दोघांकडे असलेली प्रतिभा आर्थिक अडचणीमुळे वाया जाऊ नये, म्हणून आपण मदत करत असल्याचं या वेळी किरण रिजिजू म्हणाले.

या दोघांना केंद्र सरकारच्या वतीने मदतीची घोषणा करण्यात आल्यानंतर आनंद झाला आहे. सरकारने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले असून ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं दोघा भावांचं स्वप्न आहे. या दोघांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं जिंकली आहेत. ही पदकं घरामध्ये पदके ठेवायला देखील आता जागा कमी पडत आहे. सुनील चौहान याने खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे, तर नीरज चौहान याने रौप्य पदक मिळवले आहे.

या मुलांचे वडील अक्षय चौहान हे मूळचे गोरखपूरचे आहेत. मागील 23 वर्षांपासून ते मेरठमध्ये राहत आहेत. त्याचबरोबर मेरठमधील कैलाश प्रकाश स्टेडियममधील मेसमध्ये आचारी म्हणून काम करत होते. पण कोरोनाच्या काळात खेळाडू घरी गेल्यामुळे त्यांची नोकरी गेली. त्यानंतर उपजीविका चालवण्यासाठी त्यांना भाजी विकावी लागली. याआधी त्यांनी सरकारकडे देखील आपल्या मुलांची मदत करण्याची मागणी केली होती.

Published by: Shreyas
First published: October 8, 2020, 11:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या