Home /News /sport /

IPL 2022 : फिक्सिंगचं भूत पुन्हा आयपीएलच्या मानगुटीवर, पंतचा Video Viral

IPL 2022 : फिक्सिंगचं भूत पुन्हा आयपीएलच्या मानगुटीवर, पंतचा Video Viral

आयपीएल (IPL) आणि वादांचं नातं तसं जुनंच आहे. मैदानामध्ये कधी खेळाडूंमध्ये वाद होतात, तर कधी स्पर्धेवर फिक्सिंगचे (IPL Spot Fixing) आरोप केले जातात. आयपीएल 2022 चा (IPL 2022) रोमांच आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असताना पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनी डोकं वर काढलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 मे : आयपीएल (IPL) आणि वादांचं नातं तसं जुनंच आहे. मैदानामध्ये कधी खेळाडूंमध्ये वाद होतात, तर कधी स्पर्धेवर फिक्सिंगचे (IPL Spot Fixing) आरोप केले जातात. आयपीएल 2022 चा (IPL 2022) रोमांच आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असताना पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनी डोकं वर काढलं आहे. पाकिस्तानकडून मिळालेल्या 2019 च्या कथित स्पॉट फिक्सिंगच्या माहितीनुसार सीबीआयने (CBI) सात संशयित सट्टेबाजांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यानंतर लगेचच 2019 आयपीएलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 2019 आयपीएलचा हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा (Rishabh Pant) आहे. आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी (Lalit Modi) यांनी 2019 साली हा व्हिडिओ शेयर केला होता. ऋषभ पंतला फोर कधी जाणार, हे आधीच माहिती होतं, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यातल्या मॅचवेळचा हा व्हिडिओ आहे. केकेआरचा रॉबिन उथप्पा बॅटिंग करत असताना संदीप लामिछाने बॉलिंग करत होता, तेव्हा विकेट मागे उभा असलेला पंत हा तसाही फोर जाणार असल्याचं म्हणाला, असं मोदींनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. लामिछानेने बॉल टाकला तेव्हा झालंही असंच, उथप्पाने त्या बॉलला फोर मारली. 'ही काय मस्करी आहे, विश्वास बसत नाही. मोठ्या लेव्हलवर मॅच फिक्सिंग. आयपीएल, बीसीसीआय आणि आयसीसीला कधी कळेल? लाजिरवाणं, अधिकाऱ्यांना खरंच कशाची काळजी नाही,' असं ट्वीट ललित मोदींनी केलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022

    पुढील बातम्या