• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Yuvraj Singh ला अटक अन् सुटकादेखील; हिटमॅनसोबतच्या लाईव्ह चॅटमुळे युवी अडचणीत

Yuvraj Singh ला अटक अन् सुटकादेखील; हिटमॅनसोबतच्या लाईव्ह चॅटमुळे युवी अडचणीत

Yuvraj Singh

Yuvraj Singh

टीम इंडीयाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला (Yuvraj Singh Arrest) त्यांच्याच सहकारी क्रिकेटपटूबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी हरियाणामध्ये (Haryana Police)अटक करण्यात आली. दरम्यान, त्याची तात्काळ जामिनावर सुटकादेखील करण्यात आली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : टीम इंडीयाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला (Yuvraj Singh Arrest) त्यांच्याच सहकारी क्रिकेटपटूबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी हरियाणामध्ये (Haryana Police)अटक करण्यात आली. दरम्यान, त्याची तात्काळ जामिनावर सुटकादेखील करण्यात आली. पण लवकरच अंतरिम जामिनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे तक्रारदार वकील आणि सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी सांगितले आहे.

  लाईव्ह चॅटमुळे युवी अडचणीत

  गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान इतर अनेक खेळाडूंप्रमाणे युवराज सिंहदेखील आपल्या सहकारी खेळाडूंसह इंस्टाग्राम लाईव्हवर बोलत होता आणि चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मासोबत असेच एक लाईव्ह चॅट केले. या लाईव्हदरम्यान युवीने भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलबद्दल एक शब्द वापरला होता. रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीनं चहलला 'भंगी' असं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. ''ये भं**** लोगो को काम नही है, ये युझी और इसको ( कुलदीप)'' असे युवी रोहितला म्हणाला होता. त्याची ही टिप्पणी दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला आणि त्याबाबत नंतर युवीनं माफीही मागितली होती. युवराजच्या या वक्तव्यानंतर बराच वाद झाला आणि सोशल मीडियावर त्याच्या विरोधात बरीच मोहीम सुरू झाली. दुसरीकडे सोशल मीडिया व्यतिरिक्त हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हंसी येथील वकील रजत कलसन यांनी माजी भारतीय क्रिकेटपटूविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर एससी-एसटी कायद्याच्या कलमांखाली युवराजविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. हे वकील गेल्या वर्षापासून युवराजच्या अटकेची मागणी करत होते.

  अटक अन् सुटकादेखील

  युवराजला शनिवारी 16 ऑक्टोबरला हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी येथे अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर युवराजला औपचारिक जामिनावर सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात हायकोर्टानं युवराजला जामिन दिला होता. हांसी पोलिसांनी औपचारिकता म्हणून त्याला अटक केली. यावेळी त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आणि नंतर त्याला सोडण्यात आले. पण तक्रारदार वकील आणि सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी कोर्टाच्या या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: