मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रीडाक्षेत्राला तेव्हाही जातीभेदाचा शाप, आजही कलंक!

क्रीडाक्षेत्राला तेव्हाही जातीभेदाचा शाप, आजही कलंक!

 आपल्या देशात जातीभेद (Cast Based Discrimination) करणं हा कायदेशीर गुन्हा असला, तरी प्रत्यक्षात समाजात आजच्या आधुनिक काळातही जातीभेदाची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. हैद्राबादमध्ये (Hyderabad)अलीकडेच ब्राह्मण क्रिकेट स्पर्धा (Brahmin Cricket Tournament) आयोजनाच्या बातम्यांवरून पुन्हा एकदा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

आपल्या देशात जातीभेद (Cast Based Discrimination) करणं हा कायदेशीर गुन्हा असला, तरी प्रत्यक्षात समाजात आजच्या आधुनिक काळातही जातीभेदाची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. हैद्राबादमध्ये (Hyderabad)अलीकडेच ब्राह्मण क्रिकेट स्पर्धा (Brahmin Cricket Tournament) आयोजनाच्या बातम्यांवरून पुन्हा एकदा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

आपल्या देशात जातीभेद (Cast Based Discrimination) करणं हा कायदेशीर गुन्हा असला, तरी प्रत्यक्षात समाजात आजच्या आधुनिक काळातही जातीभेदाची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. हैद्राबादमध्ये (Hyderabad)अलीकडेच ब्राह्मण क्रिकेट स्पर्धा (Brahmin Cricket Tournament) आयोजनाच्या बातम्यांवरून पुन्हा एकदा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

पुढे वाचा ...
हैदराबाद, 30 डिसेंबर : आपल्या देशात जातीभेद (Cast Based Discrimination) करणं हा कायदेशीर गुन्हा असला, तरी प्रत्यक्षात समाजात आजच्या आधुनिक काळातही जातीभेदाची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. हैद्राबादमध्ये (Hyderabad)अलीकडेच ब्राह्मण क्रिकेट स्पर्धा (Brahmin Cricket Tournament) आयोजनाच्या बातम्यांवरून पुन्हा एकदा याबाबत चर्चा सुरू झाली आहे. देशातील क्रीडा क्षेत्राचा इतिहासही जातीवर आधारीत भेदभावाचा साक्षीदार आहे. भारताच्या राज्यघटनेत इतिहासातील चुका आणि अन्याय दूर करण्यासाठी जातीभेदाला स्थान दिलं जाणार नाही, असं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. तरीही देशातील जातीभेद संपलेला नाही. हैद्राबादमधील घटनेच्या निमित्तानं जातिभेदाचा बळी ठरलेल्या प्रतिभावान खेळाडूंची काही नावं पुन्हा चर्चेत आली आहेत. त्यातील तीन खेळाडूंविषयी.... पहिले दलित क्रिकेटपटू बाळू पालवणकर जातीवादाविरूद्ध क्रिकेटच्या मैदानात आणि बाहेरही संघर्ष करणारे बाळू पालवणकर (Balu Palwankar)केवळ पहिले दलित क्रिकेटर (Cricketer) म्हणून नव्हे तर उत्तम खेळासाठी ओळखले जातात. चरितार्थासाठी बाळू पालवणकर यांनी वयाच्या 17 व्या वर्षी तेव्हाच्या केवळ युरोपीयनांसाठी राखीव पूना क्‍लबमध्ये (Poona Club)क्रिकेटच्या मैदानाची निगा राखण्याची नोकरी सुरू केली. तेथे इंग्रज आणि परदेशी खेळाडूंसाठी बॉलिंग करण्याचं काम त्यांना देण्यात आलं. फावल्या वेळात नेटवर गोलंदाजी करत ते फिरकीत पारंगत झाले. हळूहळू त्यांच्या खेळाची ख्याती सर्वत्र पसरली. हिंदू जिमखान्याच्या (Hindu Gymkhana) संघात त्यांना खेळायला बोलावण्यात आलं. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर हिंदू संघानं इंग्रजांच्या विरुद्ध अनेक सामने जिंकले. भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचे खेळाडू म्हणून ते ओळखले जाऊ लागले. 1911 मधील भारतीय संघाच्या पहिल्या इंग्लंडच्या दौर्‍यात त्यांनी पहिल्या श्रेणीच्या सामन्यात 18.84 च्या सरासरीनं 114 विकेट्स घेतल्या होत्या. केम्ब्रिज संघाविरुद्ध 8 विकेट्स 103 धावा हा त्यांचा सर्वोत्कृष्ट स्कोअर ठरला. सर्वांहून सरस कामगिरी करणाऱ्या या खेळाडूला बाकीचे खेळाडू अतिशय वाईट वागणूक द्यायचे. जातीवरून त्यांना टोमणे मारले जायचे. बाकीचे खेळाडू त्यांना आपल्याबरोबर जेवूही द्यायचे नाहीत. पॅव्हेलियनच्या बाहेर त्यांना चहा दिला जायचा. जेवताना त्यांचे टेबल सगळ्यांपासून दूर वेगळ्या ठिकाणी लावलं जायचं. त्यांचं ताट, भांडी वेगळी ठेवली जात असत. त्यांना हातपाय धुवायचे असोत किंवा पाणी प्यायचं असेल तर दलित समाजातील व्यक्तीच त्यांना या गोष्टी देत असे. दलित असल्यानं तुलसी हेलनला मिळाली नाही संधी बॉक्सिंगकडून (Boxing) मिक्स्ड मार्शल आर्टकडे (Martial Arts) वळलेल्या तुलसी हेलन (Tulasi Helen) हिला एकेकाळी तिची पंचिंग स्टाईल आणि वेगवान हालचालीमुळे भारताची ‘लेडी मोहमद अली’ (Lady Mohammad Ali) असं म्हटलं जायचं पण, याच तुलसी हेलनवर पिझ्झा डिलीव्हरी करणं, रिक्षा चालवणं अशी काम करण्याची वेळ आली, कारण केवळ तिची जात. एका दलित कुटुंबात जन्म झाल्यानं मला क्रीडा संघात नेहमीच शेवटचं स्थान देण्यात आलं, असं तिनं म्हटलं होतं. तुलसी हेलनच्या वाट्याला तर दुहेरी संघर्ष आला, एक तर दलित म्हणून आणि दुसरा महिला म्हणून. बॉक्सिंग संघटनेच्या अधिकाऱ्यानं तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिनं केला होता. तुलसीची कारकीर्द पुनरुज्जीवित करण्यासाठी, तिला भारताकडून खेळण्याची संधी देण्यासाठी पैशांचीही मागणी करण्यात आली होती, मात्र कायदेशीर मार्गानं आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या हेलनची कारकीर्द कशी आणि कधी संपली कोणालाच कळलं नाही. बाळू पालवणकर यांची कहाणी अगदी जुन्या काळातील असली तरी हेलनची कथा तर आजची आहे. त्यावरून क्रीडा क्षेत्रालाही जातीयवादानं कसं पोखरलं आहे, हे स्पष्ट होतं. जातिभेदाचा बळी ठरली क्रीडापटू ज्योती बँकेतील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची मुलगी असलेल्या दिल्लीतील ज्योतीने 2013, 2014 आणि 2017 अशा तीन वर्षामध्ये आशियाई कुस्ती अजिंक्यपद (Asian Games) स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं. कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांमध्येही (Commonwealth Games) तिचा सहभाग होता. 70 किलो वजनी गटात कुस्ती खेळणारी ज्योती 2009 ते 2016 या काळात दिल्ली पोलीस दलात कार्यरत होती. त्यानंतर ती प्राप्तीकर विभागात रुजू झाल्याचं वृत्त होतं, मात्र त्यांनंतर काहीही खबर नाही. आपल्यावरील अन्यायाची व्यथा मांडताना ज्योती म्हणते, दलित असल्यानं नुकसानही होतं. अनेकदा माझ्या जातीमुळे अगदी वाईट वागणूक देण्यात आली आहे. एका स्थानिक स्पर्धेत तर मी जिंकले असतानाही केवळ मी दलित जातीतील आहे, म्हणून मी हारल्याचं घोषित करण्यात आलं. आशियाई स्पर्धेत कांस्य पदाकासाठीची स्पर्धा दुसऱ्या दिवशी असताना देखील मला पुरेसा रिकव्हरी टाईम देण्यात आला नाही, एवढंच नव्हे तर केवळ मी जिंकू नये म्हणून सेमी फायनल नंतर लगेचचं हा सामना घेतला गेला. ज्योतीने 2013, 2014 आणि 2017 अशा तीनवेळा आशियाई रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक पटकावलं. या तीन कहाण्यांवरून सहज लक्षात येतं की आज ही आपल्या देशात जातीभेदाची पाळमुळं किती खोलवर रुजली आहेत. क्रीडा क्षेत्रातील या जातीभेदानं किती प्रतिभावान खेळाडूंची संधी हिरावून घेतली असेल, याची कल्पनाही करवत नाही.
First published:

पुढील बातम्या