Home /News /sport /

CPL Final 2020: IPL आधी मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंनी शाहरूखला केलं चॅम्पियन!

CPL Final 2020: IPL आधी मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंनी शाहरूखला केलं चॅम्पियन!

IPL आधी शाहरूखच्या संघाचा डंका! सलग 12 सामने जिंकत झाले CPL चॅम्पियन.

    नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सुरू झालेली कॅरेबियन प्रीमियर लीगचा 2020 (caribbean premier league) अंतिम सामना गुरुवारी पार पडला. या स्पर्धेत बॉलिवूड किंग शाहरुख खानचा (shahrukh khan) संघ त्रिनबागो नाइट रायडर्सने (trinbago knight riders) सलग 12 सामने जिंकत चॅम्पियन झाला आहे. अंतिम सामन्यात नाइट रायडर्सनं लूसिया जूक्स संघाला 8 विकेटनं नमवले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना जूक्स टीमने 154 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग नाइट रायडर्सने केवळ 18.1 ओव्हरमध्ये केला. डेरेन ब्राव्होनं या सामन्याचा विजयची चौकार मारला. सामना जिंकल्यानंतर संघाचा मालक शाहरुख खाननं लगेचच ट्वीट करत खेळाडूंचे अभिनंदन केले. शाहरुखनं, "शानदार खेळलात, तुम्हचा नेहमी मला अभिमान वाटतो. तुम्ही लोकांना आनंद देतात, अशा प्रसंगी जेव्हा प्रेक्षकही नाही आहेत". शाहरूखने यावेळी कर्णधार केरन पोलार्ड आणि डेरेन भावांचे आभार मानले. सिमन्सने केली शानदार खेळी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाइट रायडर्सने चांगली सुरुवात केली नाही. 19 धावांवरच संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. मात्र सलामीवीर लेंडी सिमन्सनं चांगली फलंदाजी केली. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर सिमन्सने आक्रमक फलंदाजी करण्यात सुरुवात केली. सिमन्सने 49 चेंडूत 84 धावा केल्या. तर ब्राव्होनं 47 चेंडूत 58 धावांची आक्रमक खेळी केली. पोलार्डच्या गोलंदाजीनं जूक्स गारद याआधी गोलंदाजीमध्ये केरन पोलार्डनं जूक्स संघाला गारद केले. पोलार्डनं 30 धावा देत 4 विकेट घेतल्या. पहिल्या ओव्हरपासूनच जूक्स संघ अडचणीत सापडला होता. 1.2 ओव्हरमध्येच त्यांचा स्टार फलंदाज कॉर्नवाल बाद झाला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या