CPL 2019 : क्रिकेटपटूला भोवले 140 किलो वजन, आळशीपणामुळं झाला रनआऊट; पाहा हा VIRAL VIDEO

CPL 2019 : क्रिकेटपटूला भोवले 140 किलो वजन, आळशीपणामुळं झाला रनआऊट; पाहा हा VIRAL VIDEO

रनआऊटचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हाला इंझमाम-उल-हकची आठवण येईल.

  • Share this:

कॅरिबियन, 26 सप्टेंबर : रहकीम कॉर्नवाल हे आता क्रिकेट जगतात लोकप्रिय झाला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात आपल्या 140 किलो वजनामुळं कॉर्नवाल चर्चेत आला होता. मात्र सध्या कॅरिबियनमध्ये सुरू असलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) मध्ये कॉर्नवाल आपला प्रभाव पडत आहे.

मात्र गयाना अमेजन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) आणि सेंट लुसिया झुक्स (St Lucia Zuks) यांच्यात झालेल्या सामन्यात मात्र कॉर्नवाल हास्यास्पद पध्दतीनं बाद झाला. कार्नवाल ज्या प्रकारे बाद झाला हे पाहून चाहत्यांना आपले हसु आवरता येत नाही आहे. कार्नवालच्या आळशीपणामुळं आणि वजनामुळं क्रिझवर उभा असतानाच तो बाद झाला. कॉर्नवॉल विकेट्सदरम्यान वेगवान धाव घेण्यासाठी प्रख्यात नाही आणि त्यामुळे तो विचित्र पद्धतीने बाद झाला.

सध्या क्रिकेटच्या इतिहासात कॉर्नवालची सर्वात वजनदार खेळाडू अशी ओळख आहे. त्यामुळं त्याच्या बाद होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॉर्नवाल सीपीएल मॅच दरम्यान जेव्हा क्रीजजवळ गेला तेव्हा त्यानं आपली बॅट खाली टेकवली नाही आणि विकेटकीपरने त्याला धावबाद केले.

वाचा-एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्याचा अपघात, मदतीसाठी धावून आला पांडया

त्याचे पूर्ण शरीर क्रीजच्या आत होते, मात्र तरी पंचांनी त्याला बाद घोषित केले याचे कारण म्हणजे त्याची बॅट क्रीजच्या आत टेकवली नाही. रिप्लेमध्ये स्पष्टपणे कॉर्नवालची चूक दिसून आली. त्याचा हा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांना एका माजी क्रिकेटपटूची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

कॉर्नवाल ज्या पध्दतीनं बाद झाला हे पाहून क्रिकेट चाहत्यांना त्याचे हसु आवरता आले नाही. मात्र, क्रिकेट चाहत्यांना ही विकेट पाहून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम-उल-हक यांची आठवण आली. दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या एका सामन्यात इंझमाम अशाच प्रकारे बाद झाला होता.

वाचा-मी काय तबला वाजवण्यासाठी आहे का? टीकाकारांवर रवी शास्त्री भडकले

त्यामुळं आता इंझमामचा मजेशीर बाद होण्याचा व्हिडिओही पुन्हा व्हायरल होत आहे.

वाचा-प्लीज मला ओपनिंगला पाठवा, सचिननं सांगितली 25 वर्षांपूर्वीची UNTOLD STORY

VIDEO : होत्याचं नव्हतं झालं, गोठ्यातील गायी-म्हशींचा हकनाक मृत्यू

Published by: Priyanka Gawde
First published: September 26, 2019, 6:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading