मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CPL मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! सलग 2 बॉलवर कॅच घेतल्यानंतरही पोलार्ड Not Out

CPL मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! सलग 2 बॉलवर कॅच घेतल्यानंतरही पोलार्ड Not Out

त्रिनिदादची बॅटींग सुरू असताना मैदानात एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहयला मिळाला. बार्बाडोस जेसन होल्डर (Jason Holder) 15 वी ओव्हर टाकत असताना हा ड्रामा झाला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 ऑगस्ट:  वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या गतविजेत्या त्रिनबागो नाईट रायडर्सनं  (Trinbago Knight Riders) या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे. कॅप्टन कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी बार्बाडोस रॉयल्सचा (Barbados Royals) 6 विकेट्सनं आरामात पराभव केला.

त्रिनिदादची बॅटींग सुरू असताना मैदानात एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहयला मिळाला. बार्बाडोस जेसन होल्डर (Jason Holder) 15 वी ओव्हर टाकत असताना हा ड्रामा झाला. या ओव्हरचा शेवटचा बॉल पोलार्डनं जोरात टोलावला होता. त्यावेळी थिसारा परेरानं मागे पळत जात पोलार्डचा जबरदस्त कॅच घेतला. परेराच्या या जोरदार फिल्डिंगनंतरही बार्बाडोसला हा आनंद साजरा करता आला नाही. कारण होल्डरनं  'नो बॉल' टाकला होता. त्यामुळे नाईट रायडर्सला 'फ्री हिट' मिळाली.

होल्डरचा पुढचा बॉलही पोलार्डच्या बॅटला लागून उंच उडाला. त्यावेळी देखील परेरानं पोलार्डचा कॅच घेतला. पण ही फ्री हिट असल्यानं नियमाप्रमाणे पोलार्ड नॉट आऊट ठरला. सलग दोन बॉलवर कॅच पकडूनही पोलार्ड सुदैवी ठरला. या चुकांचा फायदा घेत त्यानं 30 बॉलमध्ये नाबाद 58 रन करत नाईट रायडर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

IND vs ENG: चेतेश्वर पुजाराच्या टीकाकारांना रोहित शर्माचं चोख उत्तर , म्हणाला...

यापूर्वी इसारु उदानाच्या (Isaru Udana) भेदक बॉलिंगमुळे बार्बाडोसची टीम 19.2 ओव्हर्समध्ये 122 रनवर ऑल आऊट झाली. उदानानं 4 ओव्हर्समध्ये  21 रन देत 5 विकेट्स घेतल्या. बार्बाडोसकडून आझम खाननं सर्वाधिक 30 रन काढले. 123 रनचा पाठलाग करताना नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली होती. त्यांची अवस्था 4 आऊट 38 अशी बिकट झाली होती. त्यावेळी पोलार्डनं दिनेश रामदिनसोबत इनिंग सावरत टीमला 6 विकेट्सनं विजय मिळवून दिला.

First published:

Tags: Cricket, Kieron pollard