Caribbean Premier League: गोलंदाजानं टाकला असा यॉर्कर, चेंडू बॅटवर येण्याआधी फलंदाज झाला क्लिन बोल्ड, पाहा VIDEO

बापरे, अशी अजब विकेट पाहून तुमचंही डोकं गरगरेल. पाहा हा VIDEO

बापरे, अशी अजब विकेट पाहून तुमचंही डोकं गरगरेल. पाहा हा VIDEO

  • Share this:
    गयाना, 27 ऑगस्ट : इंडियन प्रीमिअर लीगआधी सध्या वेस्ट इंडिजमध्ये Caribbean Premier League ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये खेळाडू विचित्र पद्धतीने बाद होत असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सीपीएलमध्ये (CPL T20) झालेल्या गयाना अमेजन वॉरियर्स विरुद्ध जमैकाका तलावाह (Guyana Amazon Warriors Vs Jamaica Tallawahs) यांच्यातील सामन्यात एक फलंदाज विचित्र पद्धतीने बाद झाला. हा सामना जमैका संघानं आरामात जिंकला. जमैकाकडून गोलंदाज मुजीब-उर-रहमान या सामन्याचा हिरो ठरला. त्यानं तीन विकेट घेतल्या. या सामन्यात जमैका संघानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फिडेल अॅडवर्ड्सने शानदार यॉर्कर टाकत फलंदाज ब्रेंडन किंगला बाद केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा-अजब विक्रम! IPL मध्ये एकदाही शून्यावर बाद नाही झाला 'हा' दिग्गज फलंदाज गयाना प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीवीरांची जोडी फुटली. फिडेल अॅडवर्ड्सनं पहिल्याच चेंडूवर यॉर्कर टाकला, हा यॉर्कर डिफेन्स करण्याच्या नादात चेंडू बॅटला लागण्याआधी स्टम्प उडाला आणि ब्रेंडन क्लिन बोल्ड झाला. वाचा-IPL मधला 'हा' संघ आहे सर्वात वाईट, 6 संघाकडून खेळलेल्या युवीनं केला खुलासा वाचा-कसं शक्य आहे? फिल्डरनं कॅच सोडला तरी फलंदाज झाला बाद, पाहा अजब विकेटचा VIDEO या सामन्यात गयाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 108 धावा केल्या. त्यांच्याकडून रॉस टेलरनं सर्वात जास्त 23 धावा केल्या. जमैका संघाकडून फिडेल आणि मुजीबनं प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. जमैकाकडून आंद्रे रसेलनं शानदार फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
    Published by:Priyanka Gawde
    First published: