त्रिनिदाद, 18 ऑक्टोबर : वेस्ट इंडिजमध्ये आयपीएल स्टाईल खेळवण्यात येणाऱ्या कॅरिबियन प्रीमियर लीगची नुकतीच सांगता झाली. यात बार्बाडोस ट्रायडंट्सनं दमदार विजय मिळवला. गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि बार्बाडोस ट्रायडंट्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात बार्बाडोस संघानं 27 धावांनी विजय मिळवला. यात खेळाडूंबरोबर कॅरेबियन खेळाडूंची सेलिब्रेशन स्टाइल सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला.
अंतिम सामन्यात सामना जिंकल्यानंतर एका खेळाडूनं चक्क ‘बाबाजी का ठुल्लू’ स्टाइल सेलिब्रेशन केले. हे सेलिब्रेशन चांगलेच लक्षवेधी ठरले. अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजचा ऍश्ले नर्सने यानं विकेट घेतल्यानंतर ‘बाबाजी का ठुल्लू’ दाखवत अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरतर कपिल शर्माच्या शोमधली बाबाजी का ठुल्लू ही स्टाइल प्रचंड हिट झाली होती. तीच अॅक्शन नर्सनेही केली.
वाचा-अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO
Baba G Ka Thullo Celebration @KapilSharmaK9 pic.twitter.com/d1gKClMw11
— Hassam (@Hassam_gt) October 13, 2019
Omg I can't control my laugh #babagikathullu
— Moin Uddin (@MoinUdd27360004) October 13, 2019
वाचा-ड्रग्स घेऊन खेळाडूची मुलींसोबत SEX पार्टी, VIDEO लीक झाल्याने खळबळ
दरम्यान सामन्यानंतर अॅश्लेने या सेलिब्रेशनमागचे कारणही सांगितले. त्याने “मी अशाप्रकारे आनंद व्यक्त करण्यामागे माझा भारतीय मित्र सनी सोहेल जबाबदार आहे. त्यानं मला हा कार्यक्रम दाखवला होता. मला ही अॅक्शन आवडली म्हणून मी करत केली”, असे सांगितले.
वाचा-क्रिकेटमध्ये झाला मोठा भ्रष्टाचार, ICCने कर्णधारासह तीन खेळाडूंना केले निलंबित
'चंपा'वर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, राज ठाकरे यांना म्हणाले...