मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराट कोहलीचं 'ते' ट्विट ठरलं या वर्षातील सर्वांत लोकप्रिय तर सर्वाधिक रिट्विट कोणाला मिळाले?

विराट कोहलीचं 'ते' ट्विट ठरलं या वर्षातील सर्वांत लोकप्रिय तर सर्वाधिक रिट्विट कोणाला मिळाले?

सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरनं (Twitter) 2021 मधील टॉप ट्विटची (Top Tweets) यादी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) एक ट्विट या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे.

सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरनं (Twitter) 2021 मधील टॉप ट्विटची (Top Tweets) यादी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) एक ट्विट या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे.

सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरनं (Twitter) 2021 मधील टॉप ट्विटची (Top Tweets) यादी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) एक ट्विट या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे.

  मुंबई, 10 डिसेंबर : सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरनं (Twitter) 2021 मधील टॉप ट्विटची (Top Tweets) यादी जाहीर केली आहे. टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) एक ट्विट या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. विराटनं आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा करण्यासाठी जे ट्विट केलं होतं ते, या वर्षीचं सर्वांत जास्त लाईक्स मिळवलेलं ट्विट (Most Liked Tweet) ठरलं आहे. कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिनं या वर्षी (2021) जानेवारी महिन्यात मुलगी वामिकाला (Vamika) जन्म दिला होता. कोहलीनं मुलीच्या जन्माची बातमी ट्विटरवरून जाहीर केली होती.

  'तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला कन्यारत्न झालं. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत. अनुष्का आणि बाळ दोघांचीही तब्येत उत्तम आहे. आमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत,' असं ट्विट कोहलीनं 11 जानेवारी 2021 रोजी पोस्ट केलं होतं. या ट्विटला आतापर्यंत जगभरातून 5 लाख 39 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. विराटच्या मुलीच्या जन्माचं ट्विट जरी सर्वांत जास्त लोकप्रिय झालं असल तरी अद्याप कोहली आणि अनुष्कानं वामिकाला मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर ठेवलं आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी, कोहलीने पॅटर्निटी लिव्हदेखील (paternity leave) घेतली होती. त्यासाठी त्यानं अॅडिलेडमधील पहिल्या टेस्टनंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा मधूनच सोडला होता.

  '... विराटची कॅप्टनसी जाणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते', नितीन राऊत यांचा आरोप

  ऑस्ट्रेलियाचा टेस्ट कॅप्टन पॅट कमिन्सनं (Pat Cummins) भारतातील कोविड-19 (COVID-19) मदत कार्याला दिलेल्या देणगीबद्दल केलेलं ट्विट हे वर्षातील सर्वांत जास्त 'रिट्विटेड ट्विट' (Retweeted Tweet of the year) ठरलं आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी कमिन्सनं पीएम केअर्स फंडाला (PM Cares Fund) 50 हजार डॉलर्सची देणगी देण्याची घोषणा केली होती. त्याच्या या घोषणेचं भारतीयांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केलं होतं. ट्विटर इंडियानंदेखील कमिन्सच्या ट्विटचं कौतुक करत एक खास नोट लिहिली आहे.@patcummins30चं भारताला मदतीची घोषणा करणार हृदयस्पर्शी ट्विट 2021मधील सर्वाधिक रिट्विट केलेलं ट्विट ठरलं आहे, असं ट्विटर इंडियानं म्हटलं आहे.

  इंग्लंडच्या कॅप्टनचं ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर, 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

  ट्विटरच्या ‘#OnlyOnTwitter: गोल्डन ट्विट्स ऑफ 2021’ या रिपोर्टनुसार, #Covid19, #FarmersProtest, #TeamIndia, #Tokyo2020, #IPL2021, #IndVEng, #Diwali, #Master, #Bitcoin आणि #PermissionToDance हे यावर्षी सर्वात जास्त वापरले गेलेल हॅशटॅग्ज ठरले आहेत.

  विराटच्या कामाबाबत बोलायचं तर, तीन टेस्टच्या सीरिजसाठी विराट कोहली लवकरच दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. बीसीसीआयनं त्याच्या नेतृत्वाखाली 18 प्लेयर्सचा समावेश असलेल्या टेस्ट स्क्वॉडची यापूर्वीच घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त भारत तीन मॅचची वन-डे सीरिजदेखील खेळणार आहे. मात्र, त्यासाठी बोर्डानं अद्याप स्क्वॉड निवडलेला नाही. तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये पॅट कमिन्स सध्या सुरू असलेल्या अॅशेस टेस्ट सीरिजमध्ये (Ashes 2021-22 Test series) ऑस्ट्रेलियन टीमची कॅप्टन्सी करत आहे.

  First published:

  Tags: Tweet, Virat anushka, Virat kohali