चिमुरड्यांसाठी कॅप्टन कोहली झाला सांता क्लॉज, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

चिमुरड्यांसाठी कॅप्टन कोहली झाला सांता क्लॉज, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली झाला सांता.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : नाताळ म्हटलं की सर्वांचे डोळे आतुरतेने वाट पाहत असताना हे सांता क्लॉजची. सांता क्लॉज चिमुरड्यांसाठी वेगवेगळ्या भेटवस्तु आणत असतो. त्यामुळं लहान मुलांसाठी सांता म्हणजे एक आकर्षणाची बाब असते. अशाच काही शेल्टर होममध्ये राहणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यांवर हास्य आणण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सांता बनला.

कर्णधार विराट कोहली नाताळाच्या एका आठवड्यापूर्वी सिक्रेट सांता क्लॉज म्हणून शेल्टर होममध्ये दाखल झाला. मुलांना आनंद देण्यासाठी कोहलीनं सांता क्लॉजसारखे कपडेही परिधान केले होते.

वाचा-Success Story : 4 राज्य आणि 3500 किलोमीटर, एका बाईकवेडीचा थरारक प्रवास

एका व्हिडिओमध्ये विराट कोहली शेल्टर होमच्या मुलांचा एक व्हिडिओ पाहताना दिसत आहे. यात मुले त्यांच्या इच्छेबद्दल सांगत आहेत. यानंतर, मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोहली सांता बनतो. सांता म्हणून कोहली मुलांकडे जाऊन त्यांना त्यांची आवडती भेटवस्तू देतो. यानंतर मुलांना विचारले गेले की त्यांना विराट कोहलीला भेटायचे आहे का आणि मुलांनी हो उत्तर दिले. यानंतर, कोहलीनं आपल्या चेहऱ्यावरची दाढी काढली.

व्हिडिओच्या शेवटी कोहलीने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, 'हे क्षण माझ्यासाठी खास आहेत. ही सर्व मुले वर्षभर आमच्यासाठी आनंदी असतात आणि मला या सर्व मुलांसाठी चांगला वेळ आहे. आपणा सर्वांना आनंददायी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. '

वाचा-दोन्ही पायाने अपंग असूनही अख्खा देशाचा पोशिंदा झाला, वाचा तरुणाची Success स्टोरी

वाचा-विकेट घेतल्यानंतर गोलंदाजानं मैदानातच केला अजब स्टंट, पाहा सेलिब्रेशनचा VIDEO

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत व्यस्त आहे. दोन्ही संघ तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1नं बरोबरी केली आहे. तर, शेवटचा निर्णायक सामना 22 डिसेंबरला कटक येथे खेळला जाईल.

Published by: Priyanka Gawde
First published: December 20, 2019, 6:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading